Thursday, 25 July 2013

God Rava Sheera Recipe: Goda Shira Recipe - गोड शिरा रेसिपी

रव्याचा शिरा रेसिपी


साहित्य:
  • एक वाटी रवा
  • एक वाटी साखर
  • एक चमचा तूप
  • दीड वाटी पाणी
  • अर्धा चमचा वेलची पूड
  • एक चमचा काजू-बदाम तुकडे
कृती:
  • प्रथम एका कढईमध्ये तूप गरम करून रवा गुलाबी रंगाचा होई पर्यंत भाजून घ्या.
  • एका बाजूला पाणी गरम करून त्यामध्ये साखर, वेलची पूड व काजू-बदाम तुकडे टाकून उकळून घ्या.
  • आता त्यामध्ये भाजलेला रवा टाकून चमच्याने एकजीव करा.
  • झाकण ठेवून ५ ते ७ मिनिटे शिजवा, रवा फुलून आला की गॅस बंद करा.
  • गरम गरम सर्व्ह करा.

Rava Upma Recipe: Upeeth Recipe in Marathi - उपमा रेसिपी

उपमा रेसिपी (उपीठ)


साहित्य:
  • एक वाटी रवा
  • एक बारीक चिरलेला कांदा
  • ३ ते ४ चिरलेला हिरव्या मिरच्या
  • दोन चमचे चिरलेली कोथिंबीर
  • अर्धा चमचा हळद
  • अर्धा चमचा जिरे
  • अर्धा चमचा मोहरी
  • अर्धी वाटी बारीक शेव
  • चिमुटभर साखर
  • चवीनुसार मीठ
  • एक ग्लास पाणी
  • एक चमचा तूप
  • आवश्यकतेनुसार तेल
कृती:
  • प्रथम एका कढईमध्ये तूप गरम करून रवा गुलाबी रंगाचा होई पर्यंत भाजून घ्या.
  • आता वेगळ्या कढईत तेल गरम करून जिरे, मोहरी, कांदा, हिरव्या मिरच्या, हळद, मीठ व साखर टाकून चांगले परतवून घ्या.
  • त्या मध्ये एक ग्लास पाणी टाकून एक उकळी येउ द्या.
  • आता त्यामध्ये भाजलेला रवा टाकून चमच्याने एकजीव करा.
  • झाकण ठेवून ५ ते ७ मिनिटे शिजवा, रवा फुलून आला की गॅस बंद करा.
  • आणि सर्विंग बाउलमध्ये काढून कोथिंबीर व शेव टाकून सजवा, गरम गरम सर्व्ह करा.

Monday, 22 July 2013

Tomato Capsicum (Dhabu Mirchi) Soup Recipe in Marathi: टोमॅटो ढबू मिरची सूप

टोमॅटो ढबू मिरची सूप


साहित्य:
  • ४ ते ५ टोमॅटो
  • एक वाटी किसलेला चीज
  • दोन ढबू मिरच्या
  • एक वाटी कोणत्याही भाज्या
  • एक मोठा कांदा
  • दोन चमचे कोथिंबीर
  • अर्धा चमचा काळेमिरी पावडर
  • एक चमचा तेल
  • चवीनुसार मीठ
कृती:
  • प्रथम मीठ घालून टोमॅटो शिजवून घ्या.
  • नंतर गॅसवर मिरची भाजून घ्या.
  • आणि त्याची साल काढून टाका.
  • एका कढई मध्ये चिरलेला कांदा व भाज्या तेला मध्ये भाजून घ्या.
  • आता शिजलेल्या टोमॅटोची साल काढून घ्या.
  • टोमॅटो, कांदा, भोपळी मिरची, भाज्या मिक्सर मध्ये बारीक वाटून घ्या.
  • आता त्यामध्ये काळेमिरी टाकून चांगले उकळून घ्या.
  • सर्विंग बाऊल मध्ये काढून चीज व कोथिंबीरने सजवून घ्या.
  • गरम गरम सर्व्ह करा.

Advertisements

Sunday, 21 July 2013

Malvani Bangda Fry Recipe: Mackerel Fry Recipe in Marathi: मालवणी बांगडा फ्राय

मालवणी बांगडा फ्राय रेसिपी


साहित्य:
  • ४ बांगडे स्वच्छ धुतलेले
  • चिंचेचा कोळ
  • ३ चमचे तांदळाचे पीठ
  • १ चमचा रवा
  • चवीनुसार मीठ
  • तळण्यासाठी तेल
  • १ चमचा आले-लसणाची पेस्ट
  • १/२ चमचा हळद
  • दीड चमचा मालवणी मसाला
कृती:
  • मास्यांवर सुरी ने चिरा मारून घ्या.
  • सर्व मसाले चिंचेच्या कोळात घाला आणि हे मिश्रण मास्यांना लावा, आणि पाऊन तास मासे मेरीनेट होऊ द्या.
  • एका थाळीमध्ये तांदळाचे पीठ आणि रवा एकजीव करा, त्यामध्ये चवीनुसार मीठ घाला.
  • मास्यांना हे मिश्रण व्यवस्थित लावून घ्या.
  • मंद आचेवर तेलात बांगडे कुरकुरीत भाजून घ्या.
  • मालवणी बांगडा फ्राय तयार आहे, गरम गरम सर्व्ह करा.

Malvani Kolambi Bhaat Recipe: Malvani Prawn Rice in Marathi - कोलंबी भात

कोलंबी भात रेसिपी


साहित्य:
  • दीड वाट्या बासमती तांदूळ
  • १ वाटी ताजी कोलंबी
  • दीड चमचा आले-लसूण पेस्ट
  • २-३ चिरलेल्या ओल्या मिरच्या
  • १ लिंबू
  • १ चिरलेला टोमॅटो
  • चिरलेली कांद्याची पात
  • अर्धा चमचा हळद
  • १/२ मोठा चमचा गरम मसाला
  • १ लहान चमचा लाल तिखट
  • ४ तमालपत्र
  • २-३ मसाला वेलची
  • २-३ काळीमिरी
  • तेल
  • पाव वाटी कोथिंबीर
  • अर्धा वाटी खोबरं
  • मीठ चवीनुसार
  • १ चिरलेला कांदा
कृती:
  • तांदूळ धुऊन, निथळत ठेवा.
  • एका पातेल्यात 3 वाट्या पाणी उकळून बाजूला ठेवा.
  • एका कढई मध्ये तेल गरम करा.
  • त्यामध्ये कांदा परतून घ्या, त्यात तमालपत्र, मसाला वेलची, आले लसूण पेस्ट आणि मिरच्या घाला.
  • मसाला मंद आचेवर चं भाजून घ्या.
  • कोलंबी, गरम मसाला, लाल तिखट, हळद आणि तोमतो घाला, चवीनुसार मीठ घाला.
  • धुतलेले तांदूळ घालून परतून घ्या.
  • त्यामध्ये उकलेले पाणी घाला व भात शिजू द्या.
  • भातातले पाणी कमी झाल्यावर, मंद आचेवर मुरु द्या.
  • पुन्हा हा भात खोबरं, कोथिंबीर, कांद्याची पात आणि लिंबू घालून परतून घ्या.
  • मस्त कोलंबी भात तयार, गरम गरम सर्व्ह करा.

Saturday, 20 July 2013

Malvani Kombdi Vade Recipe in Marathi: मालवणी कोंबडी वडे

मालवणी कोंबडी वडे रेसिपी


साहित्य:
  • अर्धा किलो तांदूळ
  • एक वाटी उडीद डाळ
  • एक चमचा धणे
  • एक चमचा मेथ्या
  • ३ ते ४ काळी मिरी
  • चवीनुसार मीठ
  • आवश्यकतेनुसार तेल आणि पाणी
कृती:
Malvani kombdi vade recipe in Marathi, मालवणी कोंबडी वडे
  • तांदूळ स्वच्छ धुवून पातळ कपड्यावर घालून सावलीत सुकवून घ्या.
  • चांगले वाळले की मंद आचेवर तांदूळ, धणे, डाळ, मेथ्या गरम करून बारीक पीठ बनवून घ्या.
  • एक ताटामध्ये पीठ घ्या.
  • त्यात मीठ व गरम पाणी घालून पीठ चांगले मळून घ्या.
  • मळून झालेले पीठ ओल्या कपड्या खाली झाकून ठेवा.
  • ३ ते ४ तास पीठ चांगले भिजू द्या.
  • एका कढई मध्ये तेल गरम करून घ्या.
  • ओल्या कपड्यावर किवा पिशवीवर लिंबा एवडे गोल गोळे बनवून वडे थापून घ्या.
  • गरम तेलात दोन्ही बाजूने लालसर होई पर्यंत भाजून घ्या.
  • चिकन किंवा मटण रास्स्याबरोबर सर्व्ह करा.

Kanda Bhaji Recipe in Marathi: Crispy Onion Pakoda Recipe - कांदा भजी

कांदा भजी रेसिपी


साहित्य:
  • तीन कांदे बारीक चिरलेले
  • ४ ते ५ हिरव्या मिरच्या
  • २ ते ३ चमचे कोथिंबीर
  • दीड वाटी बेसन
  • अर्धा चमचा ओवा
  • अर्धा चमचा जिरे
  • अर्धा चमचा हळद
  • अर्धा चमचा लाल तिखट
  • चिमुटभर सोडा
  • चवीनुसार मीठ
  • आवश्यकतेनुसार तेल
कृती:
  • प्रथम एक कढई मध्ये तेल गरम करत ठेवा.
  • नंतर एका बाउल मध्ये बारीक कांदा, चिरलेल्या हिरव्या मिरच्या, कोथिंबीर, ओवा, जिरे, हळद, लाल तिखट, सोडा, मीठ, बेसन व पाणी घालून एकजीव करून घ्या.
  • वरून थोडे गरम तेल एक चमचा घाला म्हणजे भजी कुरकुरीत लागतील.
  • आता गरम झालेल्या तेलामध्ये भजी सोडून लाल रंगाचे होई परेन भाजून घ्या.
  • गरम गरम चहा सोबत सर्व्ह करा.

Friday, 5 July 2013

Matar Paneer Recipe in Marathi: Green Pea Paneer Curry Recipe - मटार पनीर रेसिपी

मटार पनीर रेसिपी


साहित्य:
  • ३०० ग्रम हिरवे मटार
  • २० गरम पनीर तुकडे
  • २ टोमटोची प्युरी
  • २ कांद्याची पेस्ट
  • एक चमचा लसुण पेस्ट
  • एक चमचा आले पेस्ट
  • २ चमचे मलई
  • एक चमचा लाल तिखट
  • एक चमचा गरम मसाला
  • अर्धा चमचा हळद
  • चवीनुसार मीठ
  • आवश्यतेनुसार तेल
कृती:
  • प्रथम हिरवे मटार कुकरला २ शिट्या करून उकडवून घ्या.
  • पनीरचे लहान लहान तुकडे करून तळून घ्या.
  • नंतर कुकरमधले मटार कुस्करून घ्या.
  • एका कढईमध्ये तेल गरम करून कांदा व आले-लसुण पेस्ट गुलाबी होईपर्यंत भाजून घ्या.
  • त्यामध्ये टोमटो प्युरी, मलई, लाल तिखट, हळद, गरम मसाला, चवीनुसार मीठ टाकून २ ते ३ मिनिट परतवून घ्या.
  • आता त्यामध्ये कुस्करलेला मटार ऒतुन एकजीव करून घ्या.
  • त्यामध्येच तळलेला पनीर टाकून हलवून घ्या.
  • तसेच एक वाटी पाणी गरम करून ऒतुन ५ मिनिट उकळवून घ्या.
  • मटार पनीर तयार आहे.
  • गरम गरम पराठ्या सोबत सर्व्हे करा.

Malvani Pomfret Fish Curry Recipe: Malvani Paplet Recipe मालवणी पापलेट रेसिपी

मालवणी पापलेट रेसिपी


साहित्य:
  • पापलेट चे तुकडे २५० ग्रॅम
  • १ चमचा धणेपूड
  • १ चमचा चिंचेचा कोळ
  • ३-४ लाल सुकलेल्या मिरच्या
  • १ चमचा जिरे पावडर
  • १/२ वाटी किसलेलं खोबरं
  • २ कांदे
  • १ टोमॅटो
  • २ चमचा तेल
  • ३-४ काळीमिरी
  • चिमुटभर हळद
  • मीठ चवीनुसार
कृती:
  • पापलेटचे तुकडे करा आणि ते धुवून घ्या.
  • धने आणि जिरे थोडेशे भाजून घ्या, ते मिक्सर मधून काढून घ्या, त्यामध्ये हळद आणि लाल मिरच्या घाला आणि पुन्हा हे मिश्रण मिक्सर मधून काढून घ्या.
  • एक कांदा आणि टोमॅटो चिरून ठेवा.
  • माश्याच्या तुकड्यांना मीठ आणि मिक्सर मध्ये बारीक केलेला मसाला लावा.
  • एक कांदा मिक्सर मधून काढून घ्या, त्या मध्ये किसलेला नारळ आणि काळीमिरी घाला, हे सर्व मिश्रण मिक्सर मधून काढून घ्या.
  • एका पातेल्यात तेल गरम करा, त्यामध्ये कांदा गुलाबी होईपर्यंत भाजून घ्या, त्यामध्ये टोमॅटो घाला आणि हे मिश्रण तेल बाजूला होई पर्यंत परतत राहा.
  • नारळ-कांद्याची पेस्ट त्यात घाला आणि १-२ मिनिटांसाठी शिजू द्या.
  • त्यात दीड कप पाणी ओता आणि उकळी येऊ द्या, त्यात पापलेटचे तुकडे घाला आणि ४-५ मिनिटे शिजू द्या.
  • चिंचेचा कोळ घाला आणि ५ मिनिटे अजून शिजू द्या, मालवणी पापलेट तयार आहे.
  • तांदळाची भाकर किंवा गरम भाताबरोबर सर्व्ह करा.

Monday, 24 June 2013

Karnataka Puran Poli Recipe Holige

कर्नाटकी पुरण पोळी


साहित्य:
  • एक वाटी चणाडाळ
  • एक वाटी गुळ
  • एक वाटी खोबरे
  • एक चमचा वेलची पूड
  • एक चमचा जायफळ पूड
  • एक वाटी कणिक
  • एक चमचा मैदा
  • अर्धी वाटी तेल
  • चवीपुरत मीठ
कृती:
  • मैदा व कणिक चाळून घ्या.चवीपुरते मीठ घालून थंड पाण्याने मळून घ्या.
  • आणि कणिक भरपूर तेल लावून वरखाली करून तार येऊ द्या.
  • चणाडाळ व खोबरे जास्त पाणी घालून शिजवून घ्या.
  • शिजलेली डाळ व खोबरे चाळणीत काढून सर्व पाणी काढून घ्या.
  • मग पातेल्यात ऒतुन गुळ, साखर, वेलचीपूड, जायफळपूड घालून परतावी. कोमट असतानाच बारीक पुरण बनवून घ्या.
  • भिजलेल्या कणकेचे तेल लावून गोळे बनवून थोडा थोडा पुरण भरून मैदावर गोलआकार पोळी लाटून घ्या.
  • आणि गरम तव्यावर तेल लावून दोन्ही बाजूनी शेकून घ्या, पोळी दुधाबरोबर सर्व्ह करा.

Saturday, 15 June 2013

Mava Puran Poli Recipe: Mavyachi (Khavyachi) Puran Poli in Marathi

खवा घालून पुरण पोळी रेसिपी


साहित्य:

  • १/४ किलो चण्याची डाळ
  • १/४ किलो साखर
  • २ चमचे दुध मसाला
  • १०० ग्रम खवा
  • १/२ चमचा वेलची पूड
  • १/२ चमचा जायफळ पूड
  • २ वाटी कणिक
  • १/२ वाटी मैदा
  • १ चमचा केशर
  • १/२ वाटी तेल
  • चवीपुरतं मीठ

कृती:
  • मैदा व कणिक चाळून घ्या.
  • चवीपुरते मीठ घालून थंड पाण्याने मळून घ्या, आणि कणिक भरपूर तेल लावून वरखाली करून तार येऊ द्या.
  • चणाडाळ पाणी घालून शिजवून घ्या.
  • शिजलेली डाळ चाळणीत ओतुन सर्व पाणी काढून घ्या.
  • मग पातेल्यात ऒतुन खवा, केशर, साखर, वेलचीपूड, जायफळपूड घालून परतावी.
  • कोमट असतानाच बारीक पुरण बनवून घ्या.
  • भिजलेल्या कणकेचे तेल लावून गोळे बनवून थोडा थोडा पुरण भरून तांदुळाच्या पीठवर गोलआकार पोळी लाटून घ्या.
  • गरम तव्यावर तेल लावून दोन्ही बाजूनी शेकून घ्या.
  • डीश मध्ये काढून वरून पिठी साखर भुरभुरा आणि दुधा बरोबर सर्व्ह करा.

Tuesday, 11 June 2013

Nagpur Puran Poli Recipe in Marathi

नागपुरी पुरण पोळी रेसिपी


साहित्य:
  • एक वाटी चणाडाळ
  • एक वाटी साखर
  • दोन चमचे तांदूळ
  • एक चमचा वेलची पूड
  • एक चमचा जायफळ पूड
  • एक वाटी कणिक
  • अर्धी वाटी तांदळाचं पीठ
  • एक चमचा मैदा
  • अर्धी वाटी तेल
  • चवीपुरतं मीठ

कृती:
  • मैदा व
    कणिक चाळून घ्या.
  • चवीपुरते मीठ घालून थंड पाण्याने मळून घ्या, आणि कणिक भरपूर तेल लावून वरखाली करून तार येऊ द्या.
  • चणाडाळ व तांदूळ पाणी घालून शिजवून घ्या. शिजलेली डाळ व तांदूळ चाळणीत ओतुन सर्व पाणी काढून घ्या.
  • मग पातेल्यात ऒतुन गुळ, साखर, वेलचीपूड, जायफळपूड घालून परतावी, कोमट असतानाच बारीक पुरण बनवून घ्या.
  • भिजलेल्या कणकेचे तेल लावून गोळे बनवून थोडा थोडा पुरण भरून तांदुळाच्या पीठवर गोलआकार पोळी लाटून घ्या.
  • गरम तव्यावर तेल लावून दोन्ही बाजूनी शेकून घ्या, दुधा बरोबर सर्व्ह करा.

Popular Recipes