उपमा रेसिपी (उपीठ)
साहित्य:
- एक वाटी रवा
- एक बारीक चिरलेला कांदा
- ३ ते ४ चिरलेला हिरव्या मिरच्या
- दोन चमचे चिरलेली कोथिंबीर
- अर्धा चमचा हळद
- अर्धा चमचा जिरे
- अर्धा चमचा मोहरी
- अर्धी वाटी बारीक शेव
- चिमुटभर साखर
- चवीनुसार मीठ
- एक ग्लास पाणी
- एक चमचा तूप
- आवश्यकतेनुसार तेल
- प्रथम एका कढईमध्ये तूप गरम करून रवा गुलाबी रंगाचा होई पर्यंत भाजून घ्या.
- आता वेगळ्या कढईत तेल गरम करून जिरे, मोहरी, कांदा, हिरव्या मिरच्या, हळद, मीठ व साखर टाकून चांगले परतवून घ्या.
- त्या मध्ये एक ग्लास पाणी टाकून एक उकळी येउ द्या.
- आता त्यामध्ये भाजलेला रवा टाकून चमच्याने एकजीव करा.
- झाकण ठेवून ५ ते ७ मिनिटे शिजवा, रवा फुलून आला की गॅस बंद करा.
- आणि सर्विंग बाउलमध्ये काढून कोथिंबीर व शेव टाकून सजवा, गरम गरम सर्व्ह करा.