चायनीज भेळ रेसिपी
साहित्य:
- १ कप कुरमुरे
- ७-८ पापडी
- १ चिरलेला कांदा
- १ चिरलेली काकडी
- चवीनुसार सोय सॉस
- चिल्ली सॉस
- टोमॅटो सॉस
- व्हिनेगर
- २ चिरलेल्या हिरव्या मिरच्या
- १/२ कप मोड आलेले मूग
- १ कप उकडलेले नूडल्स
- १ कप मिक्स्ड भाज्या चिरलेल्या (भोपळी मिरची, कोबी, गजर, कांदा)
- १ मोठा चमचा तेल
- मीठ चवीनुसार
- काळीमिरेपूड चवीनुसार
- तेल गरम करून चिरलेल्या भाज्या परतून घ्या.
- त्यात मिरच्या, मीठ व नूडल्स मिसळा.
- त्यात थोडं सोय सॉस, व्हिनेगर, व चिल्ली सॉस मिसळा.
- थोडा वेळ थंड होऊ द्या.
- नूडल्स व उरलेले सर्व साहित्य मिसळून, सर्व्हिंग डिश मध्ये सर्व्ह करा.