Tuesday, 11 June 2013

Puneri Puran Poli Recipe in Marathi Language

पुणेरी पुरण पोळी रेसिपी


साहित्य:

  • एक वाटी हरभरा डाळ
  • एक वाटी गुळ
  • दोन चमचे साखर
  • एक चमचा वेलची पूड
  • एक चमचा जायफळ पूड
  • अर्धी वाटी तांदळाचं पीठ
  • एक वाटी कणिक
  • एक चमचा मैदा
  • अर्धी वाटी तेल

कृती:
  • मैदा व कणिक चाळून घ्या.
  • चवीपुरते मीठ घालून कोमट पाण्याने मळून घ्या, आणि कणिक मुरत ठेवा.
  • हरभरा डाळ जास्त पाणी घालून शिजवून घ्या. शिजलेली डाळ चाळणीत काढून सर्व पाणी काढून घ्या.
  • मग पातेल्यात ऒतुन गुळ, साखर, वेलचीपूड, जायफळपूड घालून परतावी.
  • रंगासाठी थोडी हळद घालून थंड करा आणि बारीक पुरण बनवून घ्या.
  • भिजलेल्या कणकेचे तेल लावून गोळे बनवून थोडा थोडा पुरण भरून तांदळाच्या पीठावर गोलआकार पोळी लाटून घ्या.
  • आणि गरम तव्यावर तेल किवा तूप लावून दोन्ही बाजूनी शेकून घ्या, दुधा बरोबर सर्व्ह करा.

Popular Recipes