पुणेरी पुरण पोळी रेसिपी
साहित्य:
- एक वाटी हरभरा डाळ
- एक वाटी गुळ
- दोन चमचे साखर
- एक चमचा वेलची पूड
- एक चमचा जायफळ पूड
- अर्धी वाटी तांदळाचं पीठ
- एक वाटी कणिक
- एक चमचा मैदा
- अर्धी वाटी तेल
कृती:
- मैदा व कणिक चाळून घ्या.
- चवीपुरते मीठ घालून कोमट पाण्याने मळून घ्या, आणि कणिक मुरत ठेवा.
- हरभरा डाळ जास्त पाणी घालून शिजवून घ्या. शिजलेली डाळ चाळणीत काढून सर्व पाणी काढून घ्या.
- मग पातेल्यात ऒतुन गुळ, साखर, वेलचीपूड, जायफळपूड घालून परतावी.
- रंगासाठी थोडी हळद घालून थंड करा आणि बारीक पुरण बनवून घ्या.
- भिजलेल्या कणकेचे तेल लावून गोळे बनवून थोडा थोडा पुरण भरून तांदळाच्या पीठावर गोलआकार पोळी लाटून घ्या.
- आणि गरम तव्यावर तेल किवा तूप लावून दोन्ही बाजूनी शेकून घ्या, दुधा बरोबर सर्व्ह करा.