तंदुरी चिकन रेसिपी
साहित्य:
- १ किलो चिकन
- १ कापलेला कांदा
- २ चमचे लिंबू रस
- १ जुडी कोथिंबीर
- २ चमचे लसुन पेस्ट
- २ चमचे आल पेस्ट
- २२५ ग्रॅम दही
- २ चमचे मिरची पावडर
- १ चमचा गरम मसाला
- अर्धा चमचा वाटलेली मेथी
- १ चमचा चाट मसाला
- १ चमचा काळी मिरी वाटलेली
- ४-६ थेंब खायचा रंग
- चवीनुसार मीठ
- प्रथम सर्व मसाले एका बाउल मध्ये मिक्स करून घ्यावे.
- त्या मध्येच मीठ व लाल रंग टाकून ८-१० मिनिटे फेटावे.
- नंतर चिकनमध्ये सर्व मसाले व रंग टाकून चांगले फेटून घ्यावे.
- सर्व मसाला चिकनला चांगला लागला पाहिजे.
- नंतर रात्रभर चिकन मसाल्यात मुरु द्यावे.
- मधून मधून चिकन हलवत राहावे.
- मेरीनेटेड चिकन तंदूर मध्ये बेक करावे.
- किवा ऒवन २२० डिग्री, ४२५° डिग्री.१० मिनिटे बेक करा.नंतर पलटवून ७ मिनिटे बेक करा.
- तुकडे करून वा आवडीनुसार लिंबू व कोथिंबीर टाकून गरम गरम सर्व्ह करा.