मालवणी कोंबडी वडे रेसिपी
साहित्य:
- अर्धा किलो तांदूळ
- एक वाटी उडीद डाळ
- एक चमचा धणे
- एक चमचा मेथ्या
- ३ ते ४ काळी मिरी
- चवीनुसार मीठ
- आवश्यकतेनुसार तेल आणि पाणी
- तांदूळ स्वच्छ धुवून पातळ कपड्यावर घालून सावलीत सुकवून घ्या.
- चांगले वाळले की मंद आचेवर तांदूळ, धणे, डाळ, मेथ्या गरम करून बारीक पीठ बनवून घ्या.
- एक ताटामध्ये पीठ घ्या.
- त्यात मीठ व गरम पाणी घालून पीठ चांगले मळून घ्या.
- मळून झालेले पीठ ओल्या कपड्या खाली झाकून ठेवा.
- ३ ते ४ तास पीठ चांगले भिजू द्या.
- एका कढई मध्ये तेल गरम करून घ्या.
- ओल्या कपड्यावर किवा पिशवीवर लिंबा एवडे गोल गोळे बनवून वडे थापून घ्या.
- गरम तेलात दोन्ही बाजूने लालसर होई पर्यंत भाजून घ्या.
- चिकन किंवा मटण रास्स्याबरोबर सर्व्ह करा.