रव्याचा शिरा रेसिपी
साहित्य:
- एक वाटी रवा
- एक वाटी साखर
- एक चमचा तूप
- दीड वाटी पाणी
- अर्धा चमचा वेलची पूड
- एक चमचा काजू-बदाम तुकडे
- प्रथम एका कढईमध्ये तूप गरम करून रवा गुलाबी रंगाचा होई पर्यंत भाजून घ्या.
- एका बाजूला पाणी गरम करून त्यामध्ये साखर, वेलची पूड व काजू-बदाम तुकडे टाकून उकळून घ्या.
- आता त्यामध्ये भाजलेला रवा टाकून चमच्याने एकजीव करा.
- झाकण ठेवून ५ ते ७ मिनिटे शिजवा, रवा फुलून आला की गॅस बंद करा.
- गरम गरम सर्व्ह करा.