मालवणी पापलेट रेसिपी
साहित्य:
- पापलेट चे तुकडे २५० ग्रॅम
- १ चमचा धणेपूड
- १ चमचा चिंचेचा कोळ
- ३-४ लाल सुकलेल्या मिरच्या
- १ चमचा जिरे पावडर
- १/२ वाटी किसलेलं खोबरं
- २ कांदे
- १ टोमॅटो
- २ चमचा तेल
- ३-४ काळीमिरी
- चिमुटभर हळद
- मीठ चवीनुसार
- पापलेटचे तुकडे करा आणि ते धुवून घ्या.
- धने आणि जिरे थोडेशे भाजून घ्या, ते मिक्सर मधून काढून घ्या, त्यामध्ये हळद आणि लाल मिरच्या घाला आणि पुन्हा हे मिश्रण मिक्सर मधून काढून घ्या.
- एक कांदा आणि टोमॅटो चिरून ठेवा.
- माश्याच्या तुकड्यांना मीठ आणि मिक्सर मध्ये बारीक केलेला मसाला लावा.
- एक कांदा मिक्सर मधून काढून घ्या, त्या मध्ये किसलेला नारळ आणि काळीमिरी घाला, हे सर्व मिश्रण मिक्सर मधून काढून घ्या.
- एका पातेल्यात तेल गरम करा, त्यामध्ये कांदा गुलाबी होईपर्यंत भाजून घ्या, त्यामध्ये टोमॅटो घाला आणि हे मिश्रण तेल बाजूला होई पर्यंत परतत राहा.
- नारळ-कांद्याची पेस्ट त्यात घाला आणि १-२ मिनिटांसाठी शिजू द्या.
- त्यात दीड कप पाणी ओता आणि उकळी येऊ द्या, त्यात पापलेटचे तुकडे घाला आणि ४-५ मिनिटे शिजू द्या.
- चिंचेचा कोळ घाला आणि ५ मिनिटे अजून शिजू द्या, मालवणी पापलेट तयार आहे.
- तांदळाची भाकर किंवा गरम भाताबरोबर सर्व्ह करा.