मालवणी बांगडा फ्राय रेसिपी
साहित्य:
- ४ बांगडे स्वच्छ धुतलेले
- चिंचेचा कोळ
- ३ चमचे तांदळाचे पीठ
- १ चमचा रवा
- चवीनुसार मीठ
- तळण्यासाठी तेल
- १ चमचा आले-लसणाची पेस्ट
- १/२ चमचा हळद
- दीड चमचा मालवणी मसाला
- मास्यांवर सुरी ने चिरा मारून घ्या.
- सर्व मसाले चिंचेच्या कोळात घाला आणि हे मिश्रण मास्यांना लावा, आणि पाऊन तास मासे मेरीनेट होऊ द्या.
- एका थाळीमध्ये तांदळाचे पीठ आणि रवा एकजीव करा, त्यामध्ये चवीनुसार मीठ घाला.
- मास्यांना हे मिश्रण व्यवस्थित लावून घ्या.
- मंद आचेवर तेलात बांगडे कुरकुरीत भाजून घ्या.
- मालवणी बांगडा फ्राय तयार आहे, गरम गरम सर्व्ह करा.