कांदा भजी रेसिपी
साहित्य:
- तीन कांदे बारीक चिरलेले
- ४ ते ५ हिरव्या मिरच्या
- २ ते ३ चमचे कोथिंबीर
- दीड वाटी बेसन
- अर्धा चमचा ओवा
- अर्धा चमचा जिरे
- अर्धा चमचा हळद
- अर्धा चमचा लाल तिखट
- चिमुटभर सोडा
- चवीनुसार मीठ
- आवश्यकतेनुसार तेल
- प्रथम एक कढई मध्ये तेल गरम करत ठेवा.
- नंतर एका बाउल मध्ये बारीक कांदा, चिरलेल्या हिरव्या मिरच्या, कोथिंबीर, ओवा, जिरे, हळद, लाल तिखट, सोडा, मीठ, बेसन व पाणी घालून एकजीव करून घ्या.
- वरून थोडे गरम तेल एक चमचा घाला म्हणजे भजी कुरकुरीत लागतील.
- आता गरम झालेल्या तेलामध्ये भजी सोडून लाल रंगाचे होई परेन भाजून घ्या.
- गरम गरम चहा सोबत सर्व्ह करा.