मटार पनीर रेसिपी
साहित्य:
- ३०० ग्रम हिरवे मटार
- २० गरम पनीर तुकडे
- २ टोमटोची प्युरी
- २ कांद्याची पेस्ट
- एक चमचा लसुण पेस्ट
- एक चमचा आले पेस्ट
- २ चमचे मलई
- एक चमचा लाल तिखट
- एक चमचा गरम मसाला
- अर्धा चमचा हळद
- चवीनुसार मीठ
- आवश्यतेनुसार तेल
- प्रथम हिरवे मटार कुकरला २ शिट्या करून उकडवून घ्या.
- पनीरचे लहान लहान तुकडे करून तळून घ्या.
- नंतर कुकरमधले मटार कुस्करून घ्या.
- एका कढईमध्ये तेल गरम करून कांदा व आले-लसुण पेस्ट गुलाबी होईपर्यंत भाजून घ्या.
- त्यामध्ये टोमटो प्युरी, मलई, लाल तिखट, हळद, गरम मसाला, चवीनुसार मीठ टाकून २ ते ३ मिनिट परतवून घ्या.
- आता त्यामध्ये कुस्करलेला मटार ऒतुन एकजीव करून घ्या.
- त्यामध्येच तळलेला पनीर टाकून हलवून घ्या.
- तसेच एक वाटी पाणी गरम करून ऒतुन ५ मिनिट उकळवून घ्या.
- मटार पनीर तयार आहे.
- गरम गरम पराठ्या सोबत सर्व्हे करा.