खवा घालून पुरण पोळी रेसिपी
साहित्य:
- १/४ किलो चण्याची डाळ
- १/४ किलो साखर
- २ चमचे दुध मसाला
- १०० ग्रम खवा
- १/२ चमचा वेलची पूड
- १/२ चमचा जायफळ पूड
- २ वाटी कणिक
- १/२ वाटी मैदा
- १ चमचा केशर
- १/२ वाटी तेल
- चवीपुरतं मीठ
कृती:
- मैदा व कणिक चाळून घ्या.
- चवीपुरते मीठ घालून थंड पाण्याने मळून घ्या, आणि कणिक भरपूर तेल लावून वरखाली करून तार येऊ द्या.
- चणाडाळ पाणी घालून शिजवून घ्या.
- शिजलेली डाळ चाळणीत ओतुन सर्व पाणी काढून घ्या.
- मग पातेल्यात ऒतुन खवा, केशर, साखर, वेलचीपूड, जायफळपूड घालून परतावी.
- कोमट असतानाच बारीक पुरण बनवून घ्या.
- भिजलेल्या कणकेचे तेल लावून गोळे बनवून थोडा थोडा पुरण भरून तांदुळाच्या पीठवर गोलआकार पोळी लाटून घ्या.
- गरम तव्यावर तेल लावून दोन्ही बाजूनी शेकून घ्या.
- डीश मध्ये काढून वरून पिठी साखर भुरभुरा आणि दुधा बरोबर सर्व्ह करा.