कोलंबी भात रेसिपी
साहित्य:
- दीड वाट्या बासमती तांदूळ
- १ वाटी ताजी कोलंबी
- दीड चमचा आले-लसूण पेस्ट
- २-३ चिरलेल्या ओल्या मिरच्या
- १ लिंबू
- १ चिरलेला टोमॅटो
- चिरलेली कांद्याची पात
- अर्धा चमचा हळद
- १/२ मोठा चमचा गरम मसाला
- १ लहान चमचा लाल तिखट
- ४ तमालपत्र
- २-३ मसाला वेलची
- २-३ काळीमिरी
- तेल
- पाव वाटी कोथिंबीर
- अर्धा वाटी खोबरं
- मीठ चवीनुसार
- १ चिरलेला कांदा
- तांदूळ धुऊन, निथळत ठेवा.
- एका पातेल्यात 3 वाट्या पाणी उकळून बाजूला ठेवा.
- एका कढई मध्ये तेल गरम करा.
- त्यामध्ये कांदा परतून घ्या, त्यात तमालपत्र, मसाला वेलची, आले लसूण पेस्ट आणि मिरच्या घाला.
- मसाला मंद आचेवर चं भाजून घ्या.
- कोलंबी, गरम मसाला, लाल तिखट, हळद आणि तोमतो घाला, चवीनुसार मीठ घाला.
- धुतलेले तांदूळ घालून परतून घ्या.
- त्यामध्ये उकलेले पाणी घाला व भात शिजू द्या.
- भातातले पाणी कमी झाल्यावर, मंद आचेवर मुरु द्या.
- पुन्हा हा भात खोबरं, कोथिंबीर, कांद्याची पात आणि लिंबू घालून परतून घ्या.
- मस्त कोलंबी भात तयार, गरम गरम सर्व्ह करा.