टोमॅटो ढबू मिरची सूप
साहित्य:
- ४ ते ५ टोमॅटो
- एक वाटी किसलेला चीज
- दोन ढबू मिरच्या
- एक वाटी कोणत्याही भाज्या
- एक मोठा कांदा
- दोन चमचे कोथिंबीर
- अर्धा चमचा काळेमिरी पावडर
- एक चमचा तेल
- चवीनुसार मीठ
- प्रथम मीठ घालून टोमॅटो शिजवून घ्या.
- नंतर गॅसवर मिरची भाजून घ्या.
- आणि त्याची साल काढून टाका.
- एका कढई मध्ये चिरलेला कांदा व भाज्या तेला मध्ये भाजून घ्या.
- आता शिजलेल्या टोमॅटोची साल काढून घ्या.
- टोमॅटो, कांदा, भोपळी मिरची, भाज्या मिक्सर मध्ये बारीक वाटून घ्या.
- आता त्यामध्ये काळेमिरी टाकून चांगले उकळून घ्या.
- सर्विंग बाऊल मध्ये काढून चीज व कोथिंबीरने सजवून घ्या.
- गरम गरम सर्व्ह करा.
Advertisements