Wednesday 5 June 2013

Garlic Tamarind Chutney Recipe: Lasun Chinch Chatni Recipe in Marathi

चिंच-लसणाची चटणी


साहित्य:
  • १०-१२ सुक्या लाल मिरच्या
  • ५० ग्रॅम चिंच
  • चवीनुसार मीठ
  • ५० ग्रॅम लसुन
  • एक लहान चमचा जिरे पूड
कृती:
  • चिंच कमीत कमी पाण्यात भिजवून त्याचा कोळ करून घ्या.
  • लसुन सोलून घ्या, लाल मिरची हि पाण्यामध्ये भिजवून घ्या.
  • चिंचेचा कोळ,लसुन, मिरची मिक्स करून वाटून घ्या.
  • मीठ व भाजलेले जिरे मिक्स करा आणि पुन्हा एकत्र वाटा.
  • जिरे शेवटी मिक्स केले कि सुगंध कायम राहतो आता काचेच्या बरणीत भरून ठेवा.

Gajar (Carrorts) Chutney Recipe: Gajarachi Chutney Recipe in Marathi: गाजराची चटणी

गाजराची चटणी रेसिपी


साहित्य:
  • १/२ किलो गाजर
  • ५० ग्रॅम कैरी
  • १/२ चमचा मोहरीपूड
  • चवीनुसार मीठ
  • चवीनुसार मिरची
  • एक चमचा आले-लसुन पेस्ट
  • १/२ पेला व्हिनेगर
  • एक मोठा चमचा तेल
  • ३/४ वाटी साखर
कृती:
  • गाजर व कैरी सॊलुन किसून घ्या.
  • गाजर व कैरीच्या किसात मीठ,मिरची व मोहरीपूड मिक्स करून दोन दिवस ठेवा आणि आधुन मधून हलवत राहा.
  • एका जाड कढई मध्ये तेल गरम करून आले-लसुन पेस्ट परतून त्यामध्ये व्हिनेगर व साखर टाकून उकळा.
  • उकळली आल्यावर गाजर व कैरी कीस टाकून शिजवा.
  • साखर व व्हिनेगरसह चांगलं परतून घ्या आणि थंड करून काचेच्या भारनीत भरून ठेवा.
  • हि चटणी आपण गरम-गरम चपाती किंवा पराठ्या सोबत खाऊ शकता.

Coconut Barfi Recipe: Olya Narlachya Vadya Recipe in Marathi

ओल्या नारळाच्या वडया रेसिपी


साहित्य:
  • एक वाटी ओल्या नारळाचा कीस
  • एक वाटी साखर
  • दोन चमचे तूप
  • चिमुटभर वेलची पावडर
Naral Vadi
कृती:
  • कढई मध्ये तूप गरम करून घ्या
  • त्यामध्ये ओल्या नारळाचा कीस टाकून परतून घ्या
  • त्यामध्ये साखर घालून एक जीव करा साखर विरघळे पर्यंत
  • परतत राहावा.(साखर विरघळत नसेल तर त्या मध्ये थोडसं दुध घाला)
  • नंतर त्यामध्ये वेलची पूड टाकून हलवा आणि गस बंद करा
  • ह्या वड्या फ्रीझे मध्ये १०-१५ दिवस सहज टिकतात

Saturday 1 June 2013

Bottle Gourd Pickle Recipe: Dudhi Pickle Lonche Recipe in Marathi

दुधीच्या लोणच्याची रेसिपी


साहित्य:
  • २५० ग्रॅम दुधी (ताज्या आणि लहान)
  • ४ लहान चमचे मोहरीची डाळ
  • ८ हिरव्या मिरच्या
  • १ लहान चमचा लाल तिखट
  • १/२ लहान चमचा हळद
  • ३ लहान चमचे मीठ
  • १ चमचा वाटलेलं आलं
  • १/२ चमचा व्हिनेगर
  • ४ लहान चमचे मोहरीचे तेल (गरम करून थंड केलेले)
कृती:
  • दुधी धुवून त्याची साल काढून टाका
  • दुधीचे २ इंच लांब तुकडे कापा, उकळत्या पाण्यामध्ये दुधी २ मिनिटे उकळून घ्या
  • पाणी गाळून काढून टाका
  • सर्व मसाले, मोहरीचे तेल आणि दुधी मिसळून बरणीत भरून झाकण लावा
  • २-३ दिवस लोणचे उन्हात ठेवा
  • आता हे लोणचं खाण्यासाठी तयार आहे

Orange Beans Salad Recipe: Santra Chawli Salad Recipe in Marathi

ओरेंज बिन्स सलाड रेसिपी


साहित्य:
  • ३-४ संत्री
  • २ कप वाफवलेली चवळी
  • १ बारीक चिरलेली भोपळी मिरची
  • १ अर्धवट उकडलेलं गाजर
  • १०-१५ अख्रोड्चे तुकडे
  • व्हिनेगर २ चमचे
  • चिमुटभर काळेमिरपूड
  • चवीनुसार मीठ
कृती:
  • संत्री सोलून घ्या, त्याच्या पाकळ्याही सोलून घ्या
  • एका बाउल मध्ये सर्व साहित्य घ्या आणि ते व्यवस्थित एकत्रित मिसळून घ्या
  • त्यावर व्हिनेगर शिंपडा व ते व्यवस्थित मिसळून घ्या
  • काळेमिरपूड आणि मीठ घालून सर्व्ह करा

Orange Carrots Soup Recipe: Santra Gaajar Soup Recipe in Marathi

ओरेंज कॅरट सूप रेसिपी


साहित्य:
  • १ ग्लास संत्र्याचा रस
  • २ मोठी गाजरे
  • लहान आल्याचा तुकडा
  • १ दालचिनीचा तुकडा
  • चिमुटभर काळेमिरपूड
  • २ ग्लास पाणी
  • १ लहान चमचा मध
  • चवीनुसार मीठ
कृती:
  • गाजराचे ३-४ तुकडे करा आणि ती धुवून घ्या
  • ती पाण्यात शिजवून घ्या, त्या मध्ये दालचिनी, मीठ आणि आले टाका, आणि थोडा वेळ उकळू द्या
  • शिजलेली गाजरे मिक्सर मधून काढून घ्या, नंतर हे मिश्रण गाळून घ्या
  • त्यात संत्र्याचा रस घाला
  • मध आणि काळेमिरपूड घाला, सूप तयार आहे
  • हे सूप तुम्ही गरम-गरम, किंवा थंड करून सर्व्ह करू शकता

Sunday 19 May 2013

Amrakhand Recipe: Amrakhand Recipe in Marathi

आम्रखंड रेसिपी


साहित्य:
  • २ वाटी पिकलेल्या आंब्यांचा गर
  • १ वाटी ताजे दही
  • १/४ कप कनडेन्सड मिल्क
  • ४-५ बदाम
  • ४-५ पिस्ते
कृती:
  • बदाम आणि पिस्ते बारीक कापून घ्या
  • आंब्याचा गर, दही, कनडेन्सड मिल्क एकत्र मिक्सर मधून काढून घ्या
  • थोडा वेळ फ्रीजमध्ये ठेवा, सर्व्ह करताना त्यावर बदाम आणि पिस्ते टाका

Mango Rabri Recipe: Amba Rabdi Recipe in Marathi

आंब्याची रबडी रेसिपी


साहित्य:
  • २ वाटी दुध
  • दीड वाटी चिरलेला आंबा
  • साखर गरजेनुसार
  • ५-६ बदाम
  • ५-६ पिस्ते
  • वेलची पूड
  • केसर ४-५ पाकळ्या
कृती:
  • बदाम गरम पाण्यामध्ये भिजत घाला, थोड्यावेळाने साल काढून पातळ चिरून घ्या
  • पिस्त्याचे बारीक तुकडे करून घ्या
  • केसर २-३ चमच दुधात भिजत घाला
  • आंबा १/४ वाटी दुध घालून मिक्सर मधून काढून घ्या
  • राहिलेले दुध एका कढईत ओता, आणि ते जाड होईपर्यंत उकळत ठेवा
  • साखर घालून दुध हलवत राहा
  • साखर विरघळयावर गॅस बंद करा
  • दुध गार झाल्यावर त्यामध्ये, आंबा, बदाम, पिस्ते, केसर, वेलची पूड घाला
  • हे मिश्रण एक जीव करून फ्रीजमध्ये ठेवा
  • थंड झाल्यावर सर्व्ह करा

Mango Delight Recipe: Mango Delight Recipe in Marathi

आंबा डीलाईट रेसिपी


साहित्य:
  • २ पिकलेले आंबे
  • १ कप नारळाचे दुध
  • १/४ चमच वेलची पूड
  • साखर गरजेनुसार
कृती:
  • आंब्याची साल काढून त्याच्या गराची प्युरी बनवून घ्या
  • नारळाच्या दुधात, आंब्याची प्युरी, साखर, वेलची पूड घाला
  • बर्फाचे तुकडे घालून आंबा डीलाईट थंड-गार सर्व्ह करा

Gooseberry Fried Recipe: Fodniche Avle Recipe in Marathi

आंबट, गोड तिखट आवळे


साहित्य:
  • २५० ग्रॅम आवळे
  • दीड चमच तेल
  • अर्धा चमचा हळद
  • १ लहान चमचा लाल तिखट
  • मीठ चवीप्रमाणे
  • १ लहान चमचा बडीशेप
  • मेथीचे दाणे
  • अर्धा चमचा मोहरी
  • अर्धा चमचा जिरे
  • २-४ लाल मिरच्या
कृती:
  • कुकरमधून आवळे वाफवून घ्या
  • बिया काढून त्याच्या फोडी करा
  • कढईत तेल गरम करा त्यात जिरे, मोहरी, बडीशेप मेथीचे दाणे, लाल-तिखट घाला
  • त्यात लाल मिरचीचे तुकडे टाका
  • हळद, मीठ घालून मंद आचेवर शिजू द्या
  • अधून-मधून हलवत राहा
  • आपला वेगळा असा चट-पटीत आवळा तयार आहे

Litchi Sharbat Recipe: Litchi Sharbat Recipe in Marathi

थंड गार लीची सरबत रेसिपी


साहित्य:
  • ३०० ग्रॅम लीची
  • १ वाटी पाणी
  • २-३ चमच मध
कृती:
  • लीचीचा फक्त गर एक वाटी पाणी घालून मिक्सरमधून काढून घ्या
  • त्यार झालेला रस गाळून घ्या
  • त्यामध्ये मध घाला, फ्रीजमध्ये थंड करत ठेवा
  • थोडे आईस क्युब्स टाकून सर्व्ह करा

Muskmelon Sharbat Recipe: Kharbuja Sharbat Recipe in Marathi

ख़रबुजा सरबत् रेसिपि


साहित्य:
  • २ वाटी कापलेले ख़रबुजाचे तुकडे
  • दीड वाटी पाणी
  • ३ चमच मध
कृती:
  • ख़्ररबुज पाण्यात टाकून मिक्सर मधून फिरवून घ्या
  • मिक्सरमधील रस पातल कपडयाने गालून घ्या
  • त्याम्ध्ये मध टाकून एक जिव करा
  • थोडा वेळ फ्रिजमध्ये गार करत ठेवा
  • थोडे आईस क्युब्स टाकून सर्व्ह करा

Popular Recipes