दुधीच्या लोणच्याची रेसिपी
साहित्य:
- २५० ग्रॅम दुधी (ताज्या आणि लहान)
- ४ लहान चमचे मोहरीची डाळ
- ८ हिरव्या मिरच्या
- १ लहान चमचा लाल तिखट
- १/२ लहान चमचा हळद
- ३ लहान चमचे मीठ
- १ चमचा वाटलेलं आलं
- १/२ चमचा व्हिनेगर
- ४ लहान चमचे मोहरीचे तेल (गरम करून थंड केलेले)
- दुधी धुवून त्याची साल काढून टाका
- दुधीचे २ इंच लांब तुकडे कापा, उकळत्या पाण्यामध्ये दुधी २ मिनिटे उकळून घ्या
- पाणी गाळून काढून टाका
- सर्व मसाले, मोहरीचे तेल आणि दुधी मिसळून बरणीत भरून झाकण लावा
- २-३ दिवस लोणचे उन्हात ठेवा
- आता हे लोणचं खाण्यासाठी तयार आहे