चिंच-लसणाची चटणी
साहित्य:
- १०-१२ सुक्या लाल मिरच्या
- ५० ग्रॅम चिंच
- चवीनुसार मीठ
- ५० ग्रॅम लसुन
- एक लहान चमचा जिरे पूड
- चिंच कमीत कमी पाण्यात भिजवून त्याचा कोळ करून घ्या.
- लसुन सोलून घ्या, लाल मिरची हि पाण्यामध्ये भिजवून घ्या.
- चिंचेचा कोळ,लसुन, मिरची मिक्स करून वाटून घ्या.
- मीठ व भाजलेले जिरे मिक्स करा आणि पुन्हा एकत्र वाटा.
- जिरे शेवटी मिक्स केले कि सुगंध कायम राहतो आता काचेच्या बरणीत भरून ठेवा.