गाजराची चटणी रेसिपी
साहित्य:
- १/२ किलो गाजर
- ५० ग्रॅम कैरी
- १/२ चमचा मोहरीपूड
- चवीनुसार मीठ
- चवीनुसार मिरची
- एक चमचा आले-लसुन पेस्ट
- १/२ पेला व्हिनेगर
- एक मोठा चमचा तेल
- ३/४ वाटी साखर
- गाजर व कैरी सॊलुन किसून घ्या.
- गाजर व कैरीच्या किसात मीठ,मिरची व मोहरीपूड मिक्स करून दोन दिवस ठेवा आणि आधुन मधून हलवत राहा.
- एका जाड कढई मध्ये तेल गरम करून आले-लसुन पेस्ट परतून त्यामध्ये व्हिनेगर व साखर टाकून उकळा.
- उकळली आल्यावर गाजर व कैरी कीस टाकून शिजवा.
- साखर व व्हिनेगरसह चांगलं परतून घ्या आणि थंड करून काचेच्या भारनीत भरून ठेवा.
- हि चटणी आपण गरम-गरम चपाती किंवा पराठ्या सोबत खाऊ शकता.