ओरेंज कॅरट सूप रेसिपी
साहित्य:
- १ ग्लास संत्र्याचा रस
- २ मोठी गाजरे
- लहान आल्याचा तुकडा
- १ दालचिनीचा तुकडा
- चिमुटभर काळेमिरपूड
- २ ग्लास पाणी
- १ लहान चमचा मध
- चवीनुसार मीठ
- गाजराचे ३-४ तुकडे करा आणि ती धुवून घ्या
- ती पाण्यात शिजवून घ्या, त्या मध्ये दालचिनी, मीठ आणि आले टाका, आणि थोडा वेळ उकळू द्या
- शिजलेली गाजरे मिक्सर मधून काढून घ्या, नंतर हे मिश्रण गाळून घ्या
- त्यात संत्र्याचा रस घाला
- मध आणि काळेमिरपूड घाला, सूप तयार आहे
- हे सूप तुम्ही गरम-गरम, किंवा थंड करून सर्व्ह करू शकता