आंब्याची रबडी रेसिपी
साहित्य:
- २ वाटी दुध
- दीड वाटी चिरलेला आंबा
- साखर गरजेनुसार
- ५-६ बदाम
- ५-६ पिस्ते
- वेलची पूड
- केसर ४-५ पाकळ्या
- बदाम गरम पाण्यामध्ये भिजत घाला, थोड्यावेळाने साल काढून पातळ चिरून घ्या
- पिस्त्याचे बारीक तुकडे करून घ्या
- केसर २-३ चमच दुधात भिजत घाला
- आंबा १/४ वाटी दुध घालून मिक्सर मधून काढून घ्या
- राहिलेले दुध एका कढईत ओता, आणि ते जाड होईपर्यंत उकळत ठेवा
- साखर घालून दुध हलवत राहा
- साखर विरघळयावर गॅस बंद करा
- दुध गार झाल्यावर त्यामध्ये, आंबा, बदाम, पिस्ते, केसर, वेलची पूड घाला
- हे मिश्रण एक जीव करून फ्रीजमध्ये ठेवा
- थंड झाल्यावर सर्व्ह करा