Friday 7 June 2013

Butter Chicken Recipe in Marathi: बटर चिकन रेसिपी मराठी भाषे मध्ये

बटर चिकन रेसिपी


साहित्य:
  • १ किलो तंदुरी चिकन
  • ३० ग्रॅम दही
  • एक चमचा तेल
  • १ चमचा जिरे
  • २५० ग्रॅम टोमॅटो प्युरी
  • १५० ग्रॅम क्रिंम
  • १ कापलेली हिरवी मिरची
  • १ जुडी कापलेली कोथिंबीर
  • चवीनुसार मीठ
  • आवश्यकतेनुसार तेल
कृती:
  • चिकनचे ८-१० तुकडे करून घ्यावे.
  • तेल व दही गरम करावे.
  • त्यामध्ये जिरे टाकावे नंतर टोमॅटो प्युरी टाकून चांगले परतवून घ्या.
  • २ मिनिटानंतर नंतर चिकनचे तुकडे टाकून ८-१० मिनिटे शिजवावे मधून मधून हालवत राहावे.
  • नंतर क्रिम टाकून एकजीव करून सर्विंग डिशमध्ये काढून कोथिंबीर व हिरव्या मिरचीने सजवून सर्व्ह घ्यावे.

Chicken Biryani Recipe in Marathi चिकन बिर्याणी रेसिपी

चिकन बिर्याणी रेसिपी


साहित्य:
  • ५०० ग्रॅम चिकन तुकडे
  • सव्वा वाटी बासमती तांदूळ
  • १ कापलेला कांदा
  • १० ते १२ लसुन पाकळ्या
  • १ हिरवी मिरची कापलेली
  • १ तुकडा कापलेले आले
  • अर्धा चमचा चिकन मसाला
  • अर्धा चमचा गरम मसाला
  • १ ते २ लहान कापलेले टोमॅटो
  • अर्धा चमचा हळद
  • १ ते २ तमालपत्र
  • २ मसाला वेलची
  • २ लवंग
  • अर्धा चमचा केशर
  • चवीनुसार मीठ
  • आवश्यतेनुसार तेल
कृती:
  • तांदूळ धुवून अर्धा तास पाण्यामध्ये भिजवावे. एक कढईमध्ये तेल गरम करून कांदा, आले-लसुन पेस्ट, हिरवी मिरची टाकून परतवून घ्या.
  • त्यामध्ये चिकनचे तुकडे, चिकन मसाला, गरम मसाला टाकून ४ ते ५ मिनिटे परतवून घ्या.
  • त्यामध्ये मीठ व टोमटो टाकून एक वाफ येऊ द्या.
  • नंतर उतरवून एका बाजूला ठेवा.
  • एका दुसऱ्या कढईमध्ये तांदूळ व २ वाटी पाणी, हळद, तमालपत्र, मसाला वेलची, लवंग, आणि केशर टाकून पाणी सुकेपर्यंत शिजवून घ्या.
  • शिजलेल्या तांदळात चिकन टाकून अलगद मिक्स करावे आणि मंद आचेवर ८-१० मिनिटे ठेवावे.
  • चिकन बिर्याणी तयार आहे, रायता किंवा चिकन रस्स्या बरोबर सर्व्ह करा.

Spicy Vermicelli Recipe in Marathi: Tikhat shevaya in Marathi

तिखट शेवया रेसिपी

साहित्य:
  • २ मोठी वाटी शेवया
  • १ कांदा
  • ३ ते ४ हिरव्या मिरच्या
  • थोडी कोथिंबीर
  • ४ ते ५ कडीपत्याची पाने
  • एक चमचा तूप
  • अर्धा चमचा जिरे
  • अर्धा चमचा मोहरी
  • अर्धा चमचा हळद
  • चवीनुसार मीठ
  • चवीनुसार साखर
  • आवश्यकतेनुसार तेल आणि पाणी


कृती:
  • प्रथम एका कढईमध्ये तूप गरम करून घ्या.
  • त्यामध्ये शेवया खरपूस होईपरेन भाजून घ्या आणि एका ताटामध्ये काढून घ्या.
  • त्याच कढईमध्ये तेल गरम करून कडीपत्याची पाने, जिरे, मोहरी, हिरवी मिरची, बारीक चिरलेला कांदा, आणि हळद घालून परतवून घ्या.
  • त्यामध्ये एक वाटी पाणी व चवीनुसार मीठ, साखर घालून एक उकळी येऊद्या मग त्यामध्ये भाजून घेतलेल्या शेवया मिक्स करून कढईवर झाकण ठेऊन एक वाफ येउ द्या.
  • तिकट शेवया तयार आहेत गरमा गरम सर्व्ह करा.

Chicken Tandoori Recipe in Marathi तंदुरी चिकन रेसिपी

तंदुरी चिकन रेसिपी


साहित्य:
  • १ किलो चिकन
  • १ कापलेला कांदा
  • २ चमचे लिंबू रस
  • १ जुडी कोथिंबीर
  • २ चमचे लसुन पेस्ट
  • २ चमचे आल पेस्ट
  • २२५ ग्रॅम दही
  • २ चमचे मिरची पावडर
  • १ चमचा गरम मसाला
  • अर्धा चमचा वाटलेली मेथी
  • १ चमचा चाट मसाला
  • १ चमचा काळी मिरी वाटलेली
  • ४-६ थेंब खायचा रंग
  • चवीनुसार मीठ
कृती:
  • प्रथम सर्व मसाले एका बाउल मध्ये मिक्स करून घ्यावे.
  • त्या मध्येच मीठ व लाल रंग टाकून ८-१० मिनिटे फेटावे.
  • नंतर चिकनमध्ये सर्व मसाले व रंग टाकून चांगले फेटून घ्यावे.
  • सर्व मसाला चिकनला चांगला लागला पाहिजे.
  • नंतर रात्रभर चिकन मसाल्यात मुरु द्यावे.
  • मधून मधून चिकन हलवत राहावे.
  • मेरीनेटेड चिकन तंदूर मध्ये बेक करावे.
  • किवा ऒवन २२० डिग्री, ४२५° डिग्री.१० मिनिटे बेक करा.नंतर पलटवून ७ मिनिटे बेक करा.
  • तुकडे करून वा आवडीनुसार लिंबू व कोथिंबीर टाकून गरम गरम सर्व्ह करा.

Aamras Recipe: Amba Ras Recipe in Marathi

आमरस रेसिपी


साहित्य:
  • २ आंबे
  • २ चमचे साखर
  • अर्धा चमचा वेलची पूड
Aamras recipe
कृती:
  • आंब्यातील रस काढून घ्या.
  • मिक्सरच्या भांडयामध्ये साखर वेलचीपूड आणि आब्यातील रस मिक्सर मधून फिरवून घ्या.
  • आणि बाउलमध्ये काढून फ्रीजमध्ये १५ ते २० मिनिटे ठेवा.
  • हा रस चपाती किंवा पुरी बरोबर सर्व्ह करा.

Thursday 6 June 2013

Buttermilk Donut Recipe Balushahi Recipe in Marathi

बालुशाही रेसिपी


साहित्य:
  • २ वाटी मैदा
  • २ वाटी साखर
  • अर्धी वाटी दही
  • अर्धी वाटी डालडा
  • चिमुटभर सोडा
  • थोडसं पाणी
  • तळण्यासाठी तेल

कृती:
  • मैदा चाळून ताटात घ्या.
  • त्यामध्ये सोडा, डालडा व दही मिक्स करून मळून घ्या गरजेनुसार पाणी घालून मळून घ्या.
  • ५ ते १० मिनिटे कणिक मुरु द्या.नंतर त्याचे गोल गोळे बनवून घ्या. आणि हातावर थापून मध्ये होल पाडून घ्या.
  • एका कढई मध्ये तेल गरम करून गोळे तळून घ्या.
  • आता दुसरीकडे एका पातेल्यात २ वाटी साखर व त्यामध्ये साखर भिजेल एवढेच पाणी घालून एकतारी पाक बनवून घ्या
  • त्यामध्ये तळून झालेले गोळे टाकून थोडा वेळाने सर्व्हिंग डिशमध्ये काढून घ्या आणि सर्व्ह करा.

Bottle Gourd Roti (Naan) Recipe: Dudhi Naan Recipe in Marathi

खमंग दुधी नान रेसिपी


साहित्य:
  • २ वाटी मैदा
  • २ लहान चमचे साखर
  • ३/४ वाटी दही
  • १ लहान चमचा बेकिंग पावडर
  • १ वाटी किसलेला दुधी
  • ३-४ बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या
  • १ बारीक चिरलेला कांदा
  • १ लहान चमचा जिरे
  • १ लहान चमचा बडीशेप
  • चवीनुसार मीठ
कृती:
  • एका ताठामध्ये मैदा, साखर, बेकिंग पावडर, मीठ, दही, तूप मिक्स करून मळून घ्या.
  • मग आवश्यकतेनुसार पाणी मिक्स करून मळून घ्या.
  • मळून झालेलं पीठ २ तास मुरत ठेवा.
  • एक बाऊलमध्ये चेरलेला कांदा, हिरवी मिरची, दुधी, जिरे, बडीशेप मिक्स करून घ्या.
  • तयार पीठाचे लहान लहान गोळे बनवा आणि पाण्याचा हात लाऊन त्याला नानचा आकार द्या.
  • तवा गरम करून थापलेले नान तव्यावर टाका आणि तयार मसाला पसरवा. आणि नान दोन्ही बाजुंनी कुरकुरीत शेकून घ्या.
  • लोणचे किवां दही सोबत सर्व्ह करा.

Wednesday 5 June 2013

Grapes Muramba Recipe: Drakshancha Murabba Recipe in Marathi

द्राक्षांचा मुरंबा रेसिपी


साहित्य:
  • १ किलो द्राक्षे
  • १ किलो साखर
  • ८-१० थेंब गुलाब पाणी
  • १ ग्राम केशर
कृती:
  • पिकलेले द्राक्ष घेऊन पाण्यात धुवावे व एका स्वच्छ कपड्यावर पसरावे
  • साखरेचा एक तारेचा पाक तयार झाल्यावर त्यामध्ये द्राक्ष टाका
  • गुलाब पाण्याची ८-१० थेंबे व केशर टाका
  • उकळी आल्यावर खाली उतरवून थंड करा, हा मुरंबा काचेच्या बरणी मध्ये भरून ठेवा
  • हा मुरंबा लहान मुले आणि वृद्धांना खूप लाभदायी आहे

Coriander-Mint Green Chutney Recipe: Kothimbir Pudina Chatni Recipe in Marathi

कोथिंबीर-पुदिना हिरवीगार चटणी


साहित्य:
  • १०० ग्रॅम कोथिंबीर
  • दोन तीन कैऱ्या
  • १० ग्रॅम आले
  • एक लहान चमचा जिरे
  • ८-१० लसुन पाकळ्या
  • हिरवी मिरची
  • १ मोठा चमचा तेल
  • मीठ व साखर चवीनुसार
  • दोन मोठे चमचे व्हिनेगर
कृती:
  • सर्व साहित्य मिसळून मिक्सरमधून वाटून घ्या.
  • तेल गरम करून त्यात जिरे टाका.
  • जिरे तडतडल्यावर त्यात चटणी व व्हिनेगर टाकून पाणी सुके पर्यंत शिजवा.
  • थंड करून काचेच्या बरणीत भरून ठेवा.
  • खायला घेताना थोडी पातळ करून घ्या.
  • ८-१० दिवस ही चटणी ठिकून राहते.

Garlic Tamarind Chutney Recipe: Lasun Chinch Chatni Recipe in Marathi

चिंच-लसणाची चटणी


साहित्य:
  • १०-१२ सुक्या लाल मिरच्या
  • ५० ग्रॅम चिंच
  • चवीनुसार मीठ
  • ५० ग्रॅम लसुन
  • एक लहान चमचा जिरे पूड
कृती:
  • चिंच कमीत कमी पाण्यात भिजवून त्याचा कोळ करून घ्या.
  • लसुन सोलून घ्या, लाल मिरची हि पाण्यामध्ये भिजवून घ्या.
  • चिंचेचा कोळ,लसुन, मिरची मिक्स करून वाटून घ्या.
  • मीठ व भाजलेले जिरे मिक्स करा आणि पुन्हा एकत्र वाटा.
  • जिरे शेवटी मिक्स केले कि सुगंध कायम राहतो आता काचेच्या बरणीत भरून ठेवा.

Gajar (Carrorts) Chutney Recipe: Gajarachi Chutney Recipe in Marathi: गाजराची चटणी

गाजराची चटणी रेसिपी


साहित्य:
  • १/२ किलो गाजर
  • ५० ग्रॅम कैरी
  • १/२ चमचा मोहरीपूड
  • चवीनुसार मीठ
  • चवीनुसार मिरची
  • एक चमचा आले-लसुन पेस्ट
  • १/२ पेला व्हिनेगर
  • एक मोठा चमचा तेल
  • ३/४ वाटी साखर
कृती:
  • गाजर व कैरी सॊलुन किसून घ्या.
  • गाजर व कैरीच्या किसात मीठ,मिरची व मोहरीपूड मिक्स करून दोन दिवस ठेवा आणि आधुन मधून हलवत राहा.
  • एका जाड कढई मध्ये तेल गरम करून आले-लसुन पेस्ट परतून त्यामध्ये व्हिनेगर व साखर टाकून उकळा.
  • उकळली आल्यावर गाजर व कैरी कीस टाकून शिजवा.
  • साखर व व्हिनेगरसह चांगलं परतून घ्या आणि थंड करून काचेच्या भारनीत भरून ठेवा.
  • हि चटणी आपण गरम-गरम चपाती किंवा पराठ्या सोबत खाऊ शकता.

Coconut Barfi Recipe: Olya Narlachya Vadya Recipe in Marathi

ओल्या नारळाच्या वडया रेसिपी


साहित्य:
  • एक वाटी ओल्या नारळाचा कीस
  • एक वाटी साखर
  • दोन चमचे तूप
  • चिमुटभर वेलची पावडर
Naral Vadi
कृती:
  • कढई मध्ये तूप गरम करून घ्या
  • त्यामध्ये ओल्या नारळाचा कीस टाकून परतून घ्या
  • त्यामध्ये साखर घालून एक जीव करा साखर विरघळे पर्यंत
  • परतत राहावा.(साखर विरघळत नसेल तर त्या मध्ये थोडसं दुध घाला)
  • नंतर त्यामध्ये वेलची पूड टाकून हलवा आणि गस बंद करा
  • ह्या वड्या फ्रीझे मध्ये १०-१५ दिवस सहज टिकतात

Popular Recipes