बालुशाही रेसिपी
साहित्य:
- २ वाटी मैदा
- २ वाटी साखर
- अर्धी वाटी दही
- अर्धी वाटी डालडा
- चिमुटभर सोडा
- थोडसं पाणी
- तळण्यासाठी तेल
कृती:
- मैदा चाळून ताटात घ्या.
- त्यामध्ये सोडा, डालडा व दही मिक्स करून मळून घ्या गरजेनुसार पाणी घालून मळून घ्या.
- ५ ते १० मिनिटे कणिक मुरु द्या.नंतर त्याचे गोल गोळे बनवून घ्या. आणि हातावर थापून मध्ये होल पाडून घ्या.
- एका कढई मध्ये तेल गरम करून गोळे तळून घ्या.
- आता दुसरीकडे एका पातेल्यात २ वाटी साखर व त्यामध्ये साखर भिजेल एवढेच पाणी घालून एकतारी पाक बनवून घ्या
- त्यामध्ये तळून झालेले गोळे टाकून थोडा वेळाने सर्व्हिंग डिशमध्ये काढून घ्या आणि सर्व्ह करा.