चिकन बिर्याणी रेसिपी
साहित्य:
- ५०० ग्रॅम चिकन तुकडे
- सव्वा वाटी बासमती तांदूळ
- १ कापलेला कांदा
- १० ते १२ लसुन पाकळ्या
- १ हिरवी मिरची कापलेली
- १ तुकडा कापलेले आले
- अर्धा चमचा चिकन मसाला
- अर्धा चमचा गरम मसाला
- १ ते २ लहान कापलेले टोमॅटो
- अर्धा चमचा हळद
- १ ते २ तमालपत्र
- २ मसाला वेलची
- २ लवंग
- अर्धा चमचा केशर
- चवीनुसार मीठ
- आवश्यतेनुसार तेल
- तांदूळ धुवून अर्धा तास पाण्यामध्ये भिजवावे. एक कढईमध्ये तेल गरम करून कांदा, आले-लसुन पेस्ट, हिरवी मिरची टाकून परतवून घ्या.
- त्यामध्ये चिकनचे तुकडे, चिकन मसाला, गरम मसाला टाकून ४ ते ५ मिनिटे परतवून घ्या.
- त्यामध्ये मीठ व टोमटो टाकून एक वाफ येऊ द्या.
- नंतर उतरवून एका बाजूला ठेवा.
- एका दुसऱ्या कढईमध्ये तांदूळ व २ वाटी पाणी, हळद, तमालपत्र, मसाला वेलची, लवंग, आणि केशर टाकून पाणी सुकेपर्यंत शिजवून घ्या.
- शिजलेल्या तांदळात चिकन टाकून अलगद मिक्स करावे आणि मंद आचेवर ८-१० मिनिटे ठेवावे.
- चिकन बिर्याणी तयार आहे, रायता किंवा चिकन रस्स्या बरोबर सर्व्ह करा.