तिखट शेवया रेसिपी
साहित्य:- २ मोठी वाटी शेवया
- १ कांदा
- ३ ते ४ हिरव्या मिरच्या
- थोडी कोथिंबीर
- ४ ते ५ कडीपत्याची पाने
- एक चमचा तूप
- अर्धा चमचा जिरे
- अर्धा चमचा मोहरी
- अर्धा चमचा हळद
- चवीनुसार मीठ
- चवीनुसार साखर
- आवश्यकतेनुसार तेल आणि पाणी
कृती:
- प्रथम एका कढईमध्ये तूप गरम करून घ्या.
- त्यामध्ये शेवया खरपूस होईपरेन भाजून घ्या आणि एका ताटामध्ये काढून घ्या.
- त्याच कढईमध्ये तेल गरम करून कडीपत्याची पाने, जिरे, मोहरी, हिरवी मिरची, बारीक चिरलेला कांदा, आणि हळद घालून परतवून घ्या.
- त्यामध्ये एक वाटी पाणी व चवीनुसार मीठ, साखर घालून एक उकळी येऊद्या मग त्यामध्ये भाजून घेतलेल्या शेवया मिक्स करून कढईवर झाकण ठेऊन एक वाफ येउ द्या.
- तिकट शेवया तयार आहेत गरमा गरम सर्व्ह करा.