Saturday 4 May 2013

Bread Barfi Recipe: Shahi Tukda Bread Barfi Recipe in Marathi

ब्रेड बर्फी रेसिपी


साहित्य:
  • ४-५ ब्रेड स्लाईस
  • २-३ मोठे चमचे दुध पावडर
  • १/२ कप पनीर
  • १/४ कप किसलेले सफरचंद
  • तळ्ण्यासाठी तेल किंवा तूप
  • ७-८ बदाम
  • ७-८ काजू
कृती:
  • तेल किंवा तूप गरम करा.
  • ब्रेड स्लाईस आवडीनुसार कापून घ्या.
  • गरम तेलात कापलेले ब्रेड स्लाईस तळुन घ्या आणि ब्राऊन पेपरवर काढून घ्या.
  • पनीर,दुध पावडर, किसलेलं सफरचंद एकत्र मिक्स करा.
  • या मिश्रणाचा थर तळलेल्या तुकड्यांवर लाऊन घ्या.
  • सुका मेव्यानी सजून खायला घ्या.

Rabdi Recipe: Sweet Rabdi Recipe in Marathi

मस्त रबडी रेसिपी


साहित्य:
  • १ लिटर फुल क्रीम दुध
  • १/२ मोठा चमचा साखर
  • २-३ वेलची
  • ७-८ बदाम
  • १/४ कप टरबुजाच्या बिया
  • सजावटीसाठी टूटी फ्रुटी
  • १०-१५ पिस्ते पातळ चिरलेले
  • १०-१५ बेदाणे
  • १०-१२ काजू
कृती:
  • दुध मंद आचेवर उकळत ठेवा व त्यामध्ये वेलची पावडर घाला व ढवळत राहा जेणेकरून कढेला व बुडाशी साय चिकटणार नाही
  • दुध उकळून पावपट झाल्यावर साखर, बदाम व टरबुजाच्या बिया मिक्स करा
  • आपली रबडी तयार आहे, काजू, पिस्ते आणि बेदाण्याने सजवून थंड थंड सर्व्ह करा

Solkadhi Recipe: Tasty Solkadhi Recipe in Marathi

सोलकढी रेसिपी



साहित्य:
  • १ नारळ 
  • १०-१२ कोकमं (लाल रंगाची)
  • ४ पाकळ्या लसुन
  • २ ओल्या मिरच्या
  • ३-४ कोथिंबीरीच्या काड्या
  • मीठ
कृती:

  • कोकमं थोडावेळ पाण्यात भिजत ठेवा
  • नारळ किसून घ्या
  • मिक्सर मध्ये ओलं खोबरं कोथिंबीरीच्या फक्त काड्या, लसुन, मिरच्या वाटून घ्या 
  • एका गाळणीने मिश्रण गाळून घ्या, वरती आलेला चोथा पुन्हा मिक्सरमध्ये पाणी घालून बारीक करून घ्या
  • पुन्हा खोबरं गाळून कोकमं हाताने कुस्करून त्याचा अर्क काढा
  • तो वरील रसात मिक्स करा
  • चवीपुरतं मीठ घालून वरून कोथिंबीर घालून थंड गार सर्व्ह करा



Friday 3 May 2013

Basundi Recipe: Marathi Basundi Recipe

बासुंदी रेसिपी


साहित्य:

  • 2 लिटर दुध
  • २०० ग्राम साखर
  • २० ग्राम सुका मेवा 
  • ४ हिरव्या वेलची 
कृती:
  • दुध उकळून त्या मध्ये साखर मिक्स करा.
  • दुध घट्ट होई पर्यंत उकळत राहा आणि नंतर ते थंड करा
  • त्यामध्ये चिरलेला सुका मेवा आणि बारीक केलेली वेलची पावडर मिक्स करा
  • आणि हे मिश्रण फ्रीज मध्ये थंड करा
  • गार बासुंदी सर्व्ह करण्यास तयार आहे



Thursday 2 May 2013

Spinach (Palak) Chicken Recipe in Marathi: पालक चीकेन रेसिपी

लज्जतदार पालक चिकन रेसिपी


साहित्य:

  • ५०० ग्रॅम चिकन
  • २०० ग्रॅम पालक
  • २ कांदे
  • ४-५ लसणाच्या पाकळ्या
  • १ चमचा आले 
  • मिरचीची पेस्ट 
  • लसणाची पेस्ट 
  • २ टोमाटो 
  • मीठ
  • तेल २ चमचे
  • तमाल पत्रे
  • मिरे पूड 

कृती:

  • पालक व कांदा थोड्या पाण्यात उकळून घ्या आणि मिक्सर मध्ये बारीक पेस्ट करा
  • लसुन, हळद व मीठ घालून चिकन कुकर मध्ये उकडून घ्या 
  • कढईत तेल गरम करा व त्यात कांदा, आले-मिरची पेस्ट, तमाल पत्रे, लसुन पेस्ट, मीठ घालून परता
  • त्यामध्ये चिकन घाला व हे मिश्रण परतून घ्या व त्यामध्ये मिरेपूड घाला 
  • मग त्यामध्ये पालकची पेस्ट ओता
  • १०-१५ मिनिटे हे मिश्रण शिजवा 
  • अर्धा चमचा बटर घालून गरमा गरम सर्व्ह कारा

Kolhapuri Misal Recipe: Kolhapuri Misal in Marathi

कोल्हापुरी मिसळ रेसिपी: चविष्ट कोल्हापुरी मिसळ रेसिपी मराठी मध्ये



साहित्य:
  • एक वाटी भिजलेली हरबरे
  • १ कांदा
  • १ टोमाटो
  • २ मोठे चमचे घाटी मसाला
  • अर्धा लिंबू
  • १ वाटी तिखट शेव किंवा मिक्स्ड फरसाण
  • मीठ
  • कोथिंबीर
  • फोडणीकरिता हिंग
  • मोहरी
  • तेल



कृती:
  • हरभरे कुकर मध्ये वाफवून घ्या
  • कांदा, टोमाटो बारीक चिरा
  • एका पातेल्यात फोडणी करिता तेल गरम कारा
  • त्यात हिंग, मोहरी घाला
  • वाफवलेले हरभरे त्यातील पाण्यासाहित टाका
  • घाटी मसाला व चवीपुरता मीठ घालून उकळी येऊ द्या
  • सर्व्ह करताना, एका बाउल मध्ये रस्यासहित थोडे हरभरे घ्या, त्यावर तिखट शेव किंवा फरसाण घाला
  • त्यावर कांदा टोमाटो, कोथिंबीर घालून, वरून लिंबू पिला
  • गरम गरम पावाबरोबर किंवा ब्रेड बरोबर सर्व्ह कारा

Wednesday 1 May 2013

Sago Vada Recipe: Sabudana Vada Recipe in Marathi

साबुदाणा वडा रेसिपी उपवास करिता


साहित्य:


  • २ वाट्या साबुदाणे
  • १ वाटी शेंगदाणे
  • २ बटाटे
  • ४ ते ५ हिरव्या मिरच्या
  • १ लहान चमचा जिरे
  • थोडे खोबऱ्याचे बारीक तुकडे
  • मीठ
  • तळण्याकरिता वनस्पती तेल किंवा तूप


कृती:


  • साबुदाणा धुवून पाणी काढून चार तास भिजत ठेवा.
  • बटाटे उकडून घ्या आणि कुस्करून ठेवा
  • शेंगदाण्याचे जाडसर कूट करा
  • मिरच्यांचे तुकडे करा
  • भिजलेल्या साबुदाण्यात शेंगदाण्याचे कूट खोबऱ्याचे तुकडे मिरच्या जिरे चवीपुरता मीठ कुस्करलेले बटाटे एकत्र करून त्याचे गोळे करून घ्या
  • कढईत तेल किंवा तूप गरम करून गोळे तळून घ्या  
  • नारळाच्या चटणीबरोबर गरम गरम सर्व्ह करा

Saturday 23 March 2013

Egg Paratha Recipe: How To Cook Baida (Anda) Roti Marathi

अंडा पराठा रेसिपि


साहित्य:
  • मैदा १ वाटी
  • साखर चिमुट भर
  • मीठ चवीनुसार
  • ४ अंडी
  • चिरलेली कोथिम्बिर एक चमचा
  • कांदे २
  • मिरे पावडर चिमुटभर
  • धने पावडर १/२ चमचा
  • दुध अर्धा वाटी
  • कडी पत्ता ८-१० पाने
  • बडीशेप पावडर १/२ चमचा
  • आले-लसुन पेस्ट १ Tsp
  • हळद १/२ चमचा
  • तेल अवशक्तेनुसार

अंडा पराठा रेसिपि कृती

  • एक वाटी मैदा घ्या त्यामध्ये चवीनुसार मीठ, साखर आणि  अंड्याचा दोन चमचे पांढरा भाग mix करून दुध घालून मळून घ्या.
  • ती कणिक अर्धा तास भिजत ठेवा. एका bowl मध्ये अंडी फेटून घ्या, आणि bowl बाजूला ठेवून द्या.
  • एका pan मध्ये तेल गरम करून घ्या, त्या मध्ये कढी पत्ता घाला, नंतर त्या मध्ये लसुन, आले पेस्ट, बारीक चिरलेला कांदा घालून ते मिश्रण परतून घ्या.
  • या मिश्रणात हळद, मिरे पावडर, धने पावडर, बडीशेप पावडर घालून एक जीव करा. पुन्हा या मिश्रणात लाल तिखट, चवीपुरते मीठ घालून थंड करत ठेवा. 
  • थंड झालेलं मिश्रण फेटलेल्या अंड्यामध्ये ओता, हे सर्व मिश्रण एक जीव करून घ्या.
  • भिजलेला कणकेचे २ गोळे करा आणि त्या गोळ्यांचे २ पराठे लाटून घ्या. गरम झालेल्या तव्यावर थोडसं तेल टाका, आणि त्यावर लाटलेला पराठा टाका.
  • या पराठ्यावर ३-४ चमचे अंड्यात एक जीव केलेले वरील मिश्रण ओता. नंतर पराठा २ बाजूनी फोल्ड करून, पुन्हा त्यावर १ चमचा वरील मिश्रण लावून घ्या.
  • पुन्हा उरलेल्या दोन्ही बाजू फोल्ड करून घ्या. नंतर दोन्ही बाजूनी तेल लावून पराठा शेकून घ्या.
  • शेकलेला पराठा कर्णरेषेने एक समान कापून घ्या.
  • सर्व्हिंग डिश मध्ये कोथिंब्रीने पराठा सजवून घ्या, सॉस किंवा सेजवान चटणी बरोबर सर्व्ह करा.

Popular Recipes