साबुदाणा वडा रेसिपी उपवास करिता
साहित्य:
- २ वाट्या साबुदाणे
- १ वाटी शेंगदाणे
- २ बटाटे
- ४ ते ५ हिरव्या मिरच्या
- १ लहान चमचा जिरे
- थोडे खोबऱ्याचे बारीक तुकडे
- मीठ
- तळण्याकरिता वनस्पती तेल किंवा तूप
कृती:
- साबुदाणा धुवून पाणी काढून चार तास भिजत ठेवा.
- बटाटे उकडून घ्या आणि कुस्करून ठेवा
- शेंगदाण्याचे जाडसर कूट करा
- मिरच्यांचे तुकडे करा
- भिजलेल्या साबुदाण्यात शेंगदाण्याचे कूट खोबऱ्याचे तुकडे मिरच्या जिरे चवीपुरता मीठ कुस्करलेले बटाटे एकत्र करून त्याचे गोळे करून घ्या
- कढईत तेल किंवा तूप गरम करून गोळे तळून घ्या
- नारळाच्या चटणीबरोबर गरम गरम सर्व्ह करा