अंडा पराठा रेसिपि
साहित्य:
- मैदा १ वाटी
- साखर चिमुट भर
- मीठ चवीनुसार
- ४ अंडी
- चिरलेली कोथिम्बिर एक चमचा
- कांदे २
- मिरे पावडर चिमुटभर
- धने पावडर १/२ चमचा
- दुध अर्धा वाटी
- कडी पत्ता ८-१० पाने
- बडीशेप पावडर १/२ चमचा
- आले-लसुन पेस्ट १ Tsp
- हळद १/२ चमचा
- तेल अवशक्तेनुसार
अंडा पराठा रेसिपि कृती
- एक वाटी मैदा घ्या त्यामध्ये चवीनुसार मीठ, साखर आणि अंड्याचा दोन चमचे पांढरा भाग mix करून दुध घालून मळून घ्या.
- ती कणिक अर्धा तास भिजत ठेवा. एका bowl मध्ये अंडी फेटून घ्या, आणि bowl बाजूला ठेवून द्या.
- एका pan मध्ये तेल गरम करून घ्या, त्या मध्ये कढी पत्ता घाला, नंतर त्या मध्ये लसुन, आले पेस्ट, बारीक चिरलेला कांदा घालून ते मिश्रण परतून घ्या.
- या मिश्रणात हळद, मिरे पावडर, धने पावडर, बडीशेप पावडर घालून एक जीव करा. पुन्हा या मिश्रणात लाल तिखट, चवीपुरते मीठ घालून थंड करत ठेवा.
- थंड झालेलं मिश्रण फेटलेल्या अंड्यामध्ये ओता, हे सर्व मिश्रण एक जीव करून घ्या.
- भिजलेला कणकेचे २ गोळे करा आणि त्या गोळ्यांचे २ पराठे लाटून घ्या. गरम झालेल्या तव्यावर थोडसं तेल टाका, आणि त्यावर लाटलेला पराठा टाका.
- या पराठ्यावर ३-४ चमचे अंड्यात एक जीव केलेले वरील मिश्रण ओता. नंतर पराठा २ बाजूनी फोल्ड करून, पुन्हा त्यावर १ चमचा वरील मिश्रण लावून घ्या.
- पुन्हा उरलेल्या दोन्ही बाजू फोल्ड करून घ्या. नंतर दोन्ही बाजूनी तेल लावून पराठा शेकून घ्या.
- शेकलेला पराठा कर्णरेषेने एक समान कापून घ्या.
- सर्व्हिंग डिश मध्ये कोथिंब्रीने पराठा सजवून घ्या, सॉस किंवा सेजवान चटणी बरोबर सर्व्ह करा.