सोलकढी रेसिपी
साहित्य:
- १ नारळ
- १०-१२ कोकमं (लाल रंगाची)
- ४ पाकळ्या लसुन
- २ ओल्या मिरच्या
- ३-४ कोथिंबीरीच्या काड्या
- मीठ
- कोकमं थोडावेळ पाण्यात भिजत ठेवा
- नारळ किसून घ्या
- मिक्सर मध्ये ओलं खोबरं कोथिंबीरीच्या फक्त काड्या, लसुन, मिरच्या वाटून घ्या
- एका गाळणीने मिश्रण गाळून घ्या, वरती आलेला चोथा पुन्हा मिक्सरमध्ये पाणी घालून बारीक करून घ्या
- पुन्हा खोबरं गाळून कोकमं हाताने कुस्करून त्याचा अर्क काढा
- तो वरील रसात मिक्स करा
- चवीपुरतं मीठ घालून वरून कोथिंबीर घालून थंड गार सर्व्ह करा