लज्जतदार पालक चिकन रेसिपी
साहित्य:
- ५०० ग्रॅम चिकन
- २०० ग्रॅम पालक
- २ कांदे
- ४-५ लसणाच्या पाकळ्या
- १ चमचा आले
- मिरचीची पेस्ट
- लसणाची पेस्ट
- २ टोमाटो
- मीठ
- तेल २ चमचे
- तमाल पत्रे
- मिरे पूड
कृती:
- पालक व कांदा थोड्या पाण्यात उकळून घ्या आणि मिक्सर मध्ये बारीक पेस्ट करा
- लसुन, हळद व मीठ घालून चिकन कुकर मध्ये उकडून घ्या
- कढईत तेल गरम करा व त्यात कांदा, आले-मिरची पेस्ट, तमाल पत्रे, लसुन पेस्ट, मीठ घालून परता
- त्यामध्ये चिकन घाला व हे मिश्रण परतून घ्या व त्यामध्ये मिरेपूड घाला
- मग त्यामध्ये पालकची पेस्ट ओता
- १०-१५ मिनिटे हे मिश्रण शिजवा
- अर्धा चमचा बटर घालून गरमा गरम सर्व्ह कारा