मस्त रबडी रेसिपी
साहित्य:
- १ लिटर फुल क्रीम दुध
- १/२ मोठा चमचा साखर
- २-३ वेलची
- ७-८ बदाम
- १/४ कप टरबुजाच्या बिया
- सजावटीसाठी टूटी फ्रुटी
- १०-१५ पिस्ते पातळ चिरलेले
- १०-१५ बेदाणे
- १०-१२ काजू
- दुध मंद आचेवर उकळत ठेवा व त्यामध्ये वेलची पावडर घाला व ढवळत राहा जेणेकरून कढेला व बुडाशी साय चिकटणार नाही
- दुध उकळून पावपट झाल्यावर साखर, बदाम व टरबुजाच्या बिया मिक्स करा आपली रबडी तयार आहे, काजू, पिस्ते आणि बेदाण्याने सजवून थंड थंड सर्व्ह करा