कोल्हापुरी मिसळ रेसिपी: चविष्ट कोल्हापुरी मिसळ रेसिपी मराठी मध्ये
साहित्य:
- एक वाटी भिजलेली हरबरे
- १ कांदा
- १ टोमाटो
- २ मोठे चमचे घाटी मसाला
- अर्धा लिंबू
- १ वाटी तिखट शेव किंवा मिक्स्ड फरसाण
- मीठ
- कोथिंबीर
- फोडणीकरिता हिंग
- मोहरी
- तेल
कृती:
- हरभरे कुकर मध्ये वाफवून घ्या
- कांदा, टोमाटो बारीक चिरा
- एका पातेल्यात फोडणी करिता तेल गरम कारा
- त्यात हिंग, मोहरी घाला
- वाफवलेले हरभरे त्यातील पाण्यासाहित टाका
- घाटी मसाला व चवीपुरता मीठ घालून उकळी येऊ द्या
- सर्व्ह करताना, एका बाउल मध्ये रस्यासहित थोडे हरभरे घ्या, त्यावर तिखट शेव किंवा फरसाण घाला
- त्यावर कांदा टोमाटो, कोथिंबीर घालून, वरून लिंबू पिला
- गरम गरम पावाबरोबर किंवा ब्रेड बरोबर सर्व्ह कारा