A blog for Indian recipes, find the best recipes for Indian festivals, celebrations like wedding, parties, picnics & get togethers.
Friday 7 June 2013
Thursday 6 June 2013
Buttermilk Donut Recipe Balushahi Recipe in Marathi
बालुशाही रेसिपी
साहित्य:
- २ वाटी मैदा
- २ वाटी साखर
- अर्धी वाटी दही
- अर्धी वाटी डालडा
- चिमुटभर सोडा
- थोडसं पाणी
- तळण्यासाठी तेल
कृती:
- मैदा चाळून ताटात घ्या.
- त्यामध्ये सोडा, डालडा व दही मिक्स करून मळून घ्या गरजेनुसार पाणी घालून मळून घ्या.
- ५ ते १० मिनिटे कणिक मुरु द्या.नंतर त्याचे गोल गोळे बनवून घ्या. आणि हातावर थापून मध्ये होल पाडून घ्या.
- एका कढई मध्ये तेल गरम करून गोळे तळून घ्या.
- आता दुसरीकडे एका पातेल्यात २ वाटी साखर व त्यामध्ये साखर भिजेल एवढेच पाणी घालून एकतारी पाक बनवून घ्या
- त्यामध्ये तळून झालेले गोळे टाकून थोडा वेळाने सर्व्हिंग डिशमध्ये काढून घ्या आणि सर्व्ह करा.
Bottle Gourd Roti (Naan) Recipe: Dudhi Naan Recipe in Marathi
खमंग दुधी नान रेसिपी
साहित्य:
- २ वाटी मैदा
- २ लहान चमचे साखर
- ३/४ वाटी दही
- १ लहान चमचा बेकिंग पावडर
- १ वाटी किसलेला दुधी
- ३-४ बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या
- १ बारीक चिरलेला कांदा
- १ लहान चमचा जिरे
- १ लहान चमचा बडीशेप
- चवीनुसार मीठ
- एका ताठामध्ये मैदा, साखर, बेकिंग पावडर, मीठ, दही, तूप मिक्स करून मळून घ्या.
- मग आवश्यकतेनुसार पाणी मिक्स करून मळून घ्या.
- मळून झालेलं पीठ २ तास मुरत ठेवा.
- एक बाऊलमध्ये चेरलेला कांदा, हिरवी मिरची, दुधी, जिरे, बडीशेप मिक्स करून घ्या.
- तयार पीठाचे लहान लहान गोळे बनवा आणि पाण्याचा हात लाऊन त्याला नानचा आकार द्या.
- तवा गरम करून थापलेले नान तव्यावर टाका आणि तयार मसाला पसरवा. आणि नान दोन्ही बाजुंनी कुरकुरीत शेकून घ्या.
- लोणचे किवां दही सोबत सर्व्ह करा.
Wednesday 5 June 2013
Grapes Muramba Recipe: Drakshancha Murabba Recipe in Marathi
द्राक्षांचा मुरंबा रेसिपी
साहित्य:
- १ किलो द्राक्षे
- १ किलो साखर
- ८-१० थेंब गुलाब पाणी
- १ ग्राम केशर
- पिकलेले द्राक्ष घेऊन पाण्यात धुवावे व एका स्वच्छ कपड्यावर पसरावे
- साखरेचा एक तारेचा पाक तयार झाल्यावर त्यामध्ये द्राक्ष टाका
- गुलाब पाण्याची ८-१० थेंबे व केशर टाका
- उकळी आल्यावर खाली उतरवून थंड करा, हा मुरंबा काचेच्या बरणी मध्ये भरून ठेवा
- हा मुरंबा लहान मुले आणि वृद्धांना खूप लाभदायी आहे
Coriander-Mint Green Chutney Recipe: Kothimbir Pudina Chatni Recipe in Marathi
कोथिंबीर-पुदिना हिरवीगार चटणी
साहित्य:
- १०० ग्रॅम कोथिंबीर
- दोन तीन कैऱ्या
- १० ग्रॅम आले
- एक लहान चमचा जिरे
- ८-१० लसुन पाकळ्या
- हिरवी मिरची
- १ मोठा चमचा तेल
- मीठ व साखर चवीनुसार
- दोन मोठे चमचे व्हिनेगर
- सर्व साहित्य मिसळून मिक्सरमधून वाटून घ्या.
- तेल गरम करून त्यात जिरे टाका.
- जिरे तडतडल्यावर त्यात चटणी व व्हिनेगर टाकून पाणी सुके पर्यंत शिजवा.
- थंड करून काचेच्या बरणीत भरून ठेवा.
- खायला घेताना थोडी पातळ करून घ्या.
- ८-१० दिवस ही चटणी ठिकून राहते.
Garlic Tamarind Chutney Recipe: Lasun Chinch Chatni Recipe in Marathi
चिंच-लसणाची चटणी
साहित्य:
- १०-१२ सुक्या लाल मिरच्या
- ५० ग्रॅम चिंच
- चवीनुसार मीठ
- ५० ग्रॅम लसुन
- एक लहान चमचा जिरे पूड
- चिंच कमीत कमी पाण्यात भिजवून त्याचा कोळ करून घ्या.
- लसुन सोलून घ्या, लाल मिरची हि पाण्यामध्ये भिजवून घ्या.
- चिंचेचा कोळ,लसुन, मिरची मिक्स करून वाटून घ्या.
- मीठ व भाजलेले जिरे मिक्स करा आणि पुन्हा एकत्र वाटा.
- जिरे शेवटी मिक्स केले कि सुगंध कायम राहतो आता काचेच्या बरणीत भरून ठेवा.
Gajar (Carrorts) Chutney Recipe: Gajarachi Chutney Recipe in Marathi: गाजराची चटणी
गाजराची चटणी रेसिपी
साहित्य:
- १/२ किलो गाजर
- ५० ग्रॅम कैरी
- १/२ चमचा मोहरीपूड
- चवीनुसार मीठ
- चवीनुसार मिरची
- एक चमचा आले-लसुन पेस्ट
- १/२ पेला व्हिनेगर
- एक मोठा चमचा तेल
- ३/४ वाटी साखर
- गाजर व कैरी सॊलुन किसून घ्या.
- गाजर व कैरीच्या किसात मीठ,मिरची व मोहरीपूड मिक्स करून दोन दिवस ठेवा आणि आधुन मधून हलवत राहा.
- एका जाड कढई मध्ये तेल गरम करून आले-लसुन पेस्ट परतून त्यामध्ये व्हिनेगर व साखर टाकून उकळा.
- उकळली आल्यावर गाजर व कैरी कीस टाकून शिजवा.
- साखर व व्हिनेगरसह चांगलं परतून घ्या आणि थंड करून काचेच्या भारनीत भरून ठेवा.
- हि चटणी आपण गरम-गरम चपाती किंवा पराठ्या सोबत खाऊ शकता.
Coconut Barfi Recipe: Olya Narlachya Vadya Recipe in Marathi
ओल्या नारळाच्या वडया रेसिपी
साहित्य:
- एक वाटी ओल्या नारळाचा कीस
- एक वाटी साखर
- दोन चमचे तूप
- चिमुटभर वेलची पावडर
- कढई मध्ये तूप गरम करून घ्या
- त्यामध्ये ओल्या नारळाचा कीस टाकून परतून घ्या
- त्यामध्ये साखर घालून एक जीव करा साखर विरघळे पर्यंत
- परतत राहावा.(साखर विरघळत नसेल तर त्या मध्ये थोडसं दुध घाला)
- नंतर त्यामध्ये वेलची पूड टाकून हलवा आणि गस बंद करा
- ह्या वड्या फ्रीझे मध्ये १०-१५ दिवस सहज टिकतात
Saturday 1 June 2013
Bottle Gourd Pickle Recipe: Dudhi Pickle Lonche Recipe in Marathi
दुधीच्या लोणच्याची रेसिपी
साहित्य:
- २५० ग्रॅम दुधी (ताज्या आणि लहान)
- ४ लहान चमचे मोहरीची डाळ
- ८ हिरव्या मिरच्या
- १ लहान चमचा लाल तिखट
- १/२ लहान चमचा हळद
- ३ लहान चमचे मीठ
- १ चमचा वाटलेलं आलं
- १/२ चमचा व्हिनेगर
- ४ लहान चमचे मोहरीचे तेल (गरम करून थंड केलेले)
- दुधी धुवून त्याची साल काढून टाका
- दुधीचे २ इंच लांब तुकडे कापा, उकळत्या पाण्यामध्ये दुधी २ मिनिटे उकळून घ्या
- पाणी गाळून काढून टाका
- सर्व मसाले, मोहरीचे तेल आणि दुधी मिसळून बरणीत भरून झाकण लावा
- २-३ दिवस लोणचे उन्हात ठेवा
- आता हे लोणचं खाण्यासाठी तयार आहे
Orange Beans Salad Recipe: Santra Chawli Salad Recipe in Marathi
ओरेंज बिन्स सलाड रेसिपी
साहित्य:
- ३-४ संत्री
- २ कप वाफवलेली चवळी
- १ बारीक चिरलेली भोपळी मिरची
- १ अर्धवट उकडलेलं गाजर
- १०-१५ अख्रोड्चे तुकडे
- व्हिनेगर २ चमचे
- चिमुटभर काळेमिरपूड
- चवीनुसार मीठ
- संत्री सोलून घ्या, त्याच्या पाकळ्याही सोलून घ्या
- एका बाउल मध्ये सर्व साहित्य घ्या आणि ते व्यवस्थित एकत्रित मिसळून घ्या
- त्यावर व्हिनेगर शिंपडा व ते व्यवस्थित मिसळून घ्या
- काळेमिरपूड आणि मीठ घालून सर्व्ह करा
Orange Carrots Soup Recipe: Santra Gaajar Soup Recipe in Marathi
ओरेंज कॅरट सूप रेसिपी
साहित्य:
- १ ग्लास संत्र्याचा रस
- २ मोठी गाजरे
- लहान आल्याचा तुकडा
- १ दालचिनीचा तुकडा
- चिमुटभर काळेमिरपूड
- २ ग्लास पाणी
- १ लहान चमचा मध
- चवीनुसार मीठ
- गाजराचे ३-४ तुकडे करा आणि ती धुवून घ्या
- ती पाण्यात शिजवून घ्या, त्या मध्ये दालचिनी, मीठ आणि आले टाका, आणि थोडा वेळ उकळू द्या
- शिजलेली गाजरे मिक्सर मधून काढून घ्या, नंतर हे मिश्रण गाळून घ्या
- त्यात संत्र्याचा रस घाला
- मध आणि काळेमिरपूड घाला, सूप तयार आहे
- हे सूप तुम्ही गरम-गरम, किंवा थंड करून सर्व्ह करू शकता
Sunday 19 May 2013
Amrakhand Recipe: Amrakhand Recipe in Marathi
आम्रखंड रेसिपी
साहित्य:
- २ वाटी पिकलेल्या आंब्यांचा गर
- १ वाटी ताजे दही
- १/४ कप कनडेन्सड मिल्क
- ४-५ बदाम
- ४-५ पिस्ते
- बदाम आणि पिस्ते बारीक कापून घ्या
- आंब्याचा गर, दही, कनडेन्सड मिल्क एकत्र मिक्सर मधून काढून घ्या
- थोडा वेळ फ्रीजमध्ये ठेवा, सर्व्ह करताना त्यावर बदाम आणि पिस्ते टाका
Subscribe to:
Posts (Atom)
Popular Recipes
-
मालवणी कोंबडी वडे रेसिपी साहित्य : अर्धा किलो तांदूळ एक वाटी उडीद डाळ एक चमचा धणे एक चमचा मेथ्या ३ ते ४ काळी मिरी चवीनुसार म...
-
चिकन बिर्याणी रेसिपी साहित्य : ५०० ग्रॅम चिकन तुकडे सव्वा वाटी बासमती तांदूळ १ कापलेला कांदा १० ते १२ लसुन पाकळ्या १ हिरवी म...
-
तंदुरी चिकन रेसिपी साहित्य : १ किलो चिकन १ कापलेला कांदा २ चमचे लिंबू रस १ जुडी कोथिंबीर २ चमचे लसुन पेस्ट २ चमचे आल पेस्ट ...
-
कांदा भजी रेसिपी साहित्य : तीन कांदे बारीक चिरलेले ४ ते ५ हिरव्या मिरच्या २ ते ३ चमचे कोथिंबीर दीड वाटी बेसन अर्धा चमचा ओवा ...
-
कोलंबी भात रेसिपी साहित्य : दीड वाट्या बासमती तांदूळ १ वाटी ताजी कोलंबी दीड चमचा आले-लसूण पेस्ट २-३ चिरलेल्या ओल्या मिरच्या १ लिंब...
-
बालुशाही रेसिपी साहित्य : २ वाटी मैदा २ वाटी साखर अर्धी वाटी दही अर्धी वाटी डालडा चिमुटभर सोडा थोडसं पाणी तळण्यासाठी तेल ...
-
उपमा रेसिपी (उपीठ) साहित्य : एक वाटी रवा एक बारीक चिरलेला कांदा ३ ते ४ चिरलेला हिरव्या मिरच्या दोन चमचे चिरलेली कोथिंबीर अर्धा चमच...
-
तिखट शेवया रेसिपी साहित्य : २ मोठी वाटी शेवया १ कांदा ३ ते ४ हिरव्या मिरच्या थोडी कोथिंबीर ४ ते ५ कडीपत्याची पाने एक चमचा तूप अर्...
-
बटर चिकन रेसिपी साहित्य : १ किलो तंदुरी चिकन ३० ग्रॅम दही एक चमचा तेल १ चमचा जिरे २५० ग्रॅम टोमॅटो प्युरी १५० ग्रॅम क्रिंम ...
-
चायनीज भेळ रेसिपी साहित्य : १ कप कुरमुरे ७-८ पापडी १ चिरलेला कांदा १ चिरलेली काकडी चवीनुसार सोय सॉस चिल्ली सॉस टोमॅटो सॉस व्...