साबुदाणा थालीपीठ रेसिपी
साहित्य:- २/३ कप साबुदाणा
- २ मध्यम आकाराचे उकडलेले बटाटे
- १/२ लहान चमचा जीरा पावडर
- ४ मोठे चमचे शेंगदाणा कूट
- 2-3 हिरव्या मिरच्या
- १/४ कप चिरलेली कोथिंबीर
- १ चमचा लिंबाचा रस
- १ छोटा चमचा साखर
- सैंधव मीठ चवीनुसार
- तेल आवश्यकतेनुसार
कृती:
- साबुदाणा स्वच्छ धुवून घ्या आणि ते रात्रभर भिजत ठेवा.
- बटाटे मॅश करून घ्या.
- भिजवलेला साबुदाणा, मॅश केलेले बटाटे, मिरच्यांचे वाटण, जीरेपूड, शेंगदाण्याचा कूट, कोथिंबीर, लिंबाचा रस आणि चवीपुरते मीठ घालून नीट मिक्स करावे.
- मिश्रणाचे गोळे करून घ्या, त्या गोळ्यांचे थालीपीठ थापून घ्या.
- एका पॅनमध्ये १-२ मोठा चमचा तेल गरम करा.
- हे थालीपीठ खरपूस भाजून घ्या.
- शेंगदाण्याच्या गोड चटणी किंवा दहीबरोबर सर्व्ह करा.