कांद्याचे सूप
साहित्य:- दोन मोठे चिरलेले कांदे
- दोन चमचे चिरलेले कोथिंबीर
- एक मोठा चमचा चिंचेचा कोळ
- एक लाल मिरची
- एक ते दोन लसुन पाकळ्या
- एक चमचा मैदा
- एक वाटी वेगवेगळ्या भाज्या
- चिमुटभर काळेमिरी पावडर
- एक चमचा लोणी
- चवीनुसार मीठ
- प्रथम एका पातेल्या मध्ये लोणी गरम करून घ्या. त्या गरम लोण्यामध्ये चिरलेला कांदा व मैदा परतवून थंड करून घ्या. आता मिक्सर मध्ये चिंचेचा कोळ, लसुन पाकळ्य , लाल मिरची, परतवलेला कांदा व मैदा, एक वाटी मिक्स भाज्या वाटून घ्या. त्यामध्ये काळीमिरी पावडर व मीठ घाला. आणि हे मिश्रण पाच ते सात मिनिटे उकळत ठेवा. सेर्व्हिंग बाऊल मध्ये काढून कोथिंबीरने सजवून घ्या. गरम गरम सर्व्ह करा.