कोकोनट सूप
साहित्य:- एक किसलेला नारळ
- एक ते दोन हिरव्या मिरच्या
- एक मोठा चिरलेले कांदे
- दोन चमचे चिरलेले कोथिंबीर
- एक मोठा चमचा चिंचेचा कोळ
- तीन ते चार कडीपत्याची पाने
- अर्धा चमचा जिरे पावडर
- चिमुटभर काळेमिरी पावडर
- एक चमचा तेल
- चवीनुसार मीठ
- प्रथम किसलेला नारळाच दुध काढून घ्या.
- त्या रसामध्ये चिंचेचा कोळ मिक्स करून घ्या.
- आणि ते मिश्रण पाच ते सात मिनिटे उकळत ठेवा.
- आता एका पातेल्या मध्ये तेल गरम करून त्यामध्ये चिरलेला कांदा ,हिरवी मिरची , कढीपता काळेमिरी पावडर,जिरे पावडर व मीठ टाकून परतवून घ्या.
- त्यामध्ये दुध व चिंचेच्या कोळाचे मिश्रण ओतून ४ ते ५ मिनिटे हालवथ राहा.
- सर्विंग बाऊल मध्ये काढून कोथिंबीरने सजवून घ्या.
- गरम गरम सर्व्ह करा.