पौष्टिक चाट रेसिपी
साहित्य:
- एक वाटी मोड आलेली मटकी
- एक वाटी मोड आलेली मसूर
- दोन बारीक चिरलेले कांदे
- एक चिरलेली काकडी
- दोन लहान उकडलेले बटाटे
- अर्धी वाटी भाजलेले शेंगदाणे
- अर्धी वाटी नारळाचा खीस
- एक लिंबू
- दोन चमचे चिरलेली कोथिंबीर
- एक चमचा चाट मसाला
- अर्धा चमचा जिरे
- अर्धा चमचा मोहरी
- अर्धा चमचा हळद
- चिमुठभर हिंग
- ५ ते ६ हिरव्या मिरच्या
- चवीनुसार मीठ
- आवश्यकतेनुसार तेल
- प्रथम मोड आलेले मटकी व मसूर एकत्र मिक्सरमधून वाटून घ्या.
- एका बाउलमध्ये भरडलेली मटकी व मसूर काढून घ्या.
- आता यामध्ये चिरलेला कांदा, उकडलेला बटाटा, भाजके शेंगदाणे, नारळाचा खीस, मीठ, कोथिंबीर घालून मिक्स करून घ्या.
- आता कढई मध्ये तेल गरम करून जिरे, मोहरी, हिंग. हळद आणि हिरव्या मिरच्या घालून फोडणी तयार करून घ्या.
- ही फोडणी तयार मिश्रणावर ओतून घ्या.
- नंतर लिंबू पिळा व चाट मसाला टाकून सर्विंग बाउल मध्ये काढून घ्या. गरमा गरम सर्व्ह करा.