बेसनचे लाडू रेसिपी
साहित्य:
- १ किलो हरभरा डाळ
- ३०० ग्राम पिठी साखर
- ५०० ग्राम तूप
- १ मोठा चमचा वेलची पूड
- १/२ वाटी बेदाणे
- १/२ वाटी काजू तुकडे
- १/२ चमच जायफळ पूड
- एक वाटी दुध (आवश्यकता असल्यास)
कृती:
- कढईमध्ये डाळ मंद आचेवर भाजून घ्या, थंड झाल्यावर ती दळून आणा.
- दळून आणलेले पीठ चाळून घ्या.
- एका कढईमध्ये थोडे तूप गरम करा, थोडे-थोडे पीठ घालून भाजून घ्या. पिठाच्या गीठ्ल्या होणार नाहीत याची काळजी घ्या.
- सर्व पीठ भाजून झाल्यावर ते एका पातेल्या मध्ये काढून घ्या.
- थोडा वेळ हे पीठ थंड होऊ द्या.
- त्यामध्ये पिठी साखर, वेलची पूड, जायफळ पूड घालून एकजीव करा.
- आता हाताने गोल लाडू वळून घ्या. लाडू वळता येत नसतील तर त्यामध्ये दुध घाला.
- प्रत्यक लाडूला बेदाणा आणि एक काजूचा तुकडा लावा.