पौष्टिक पालक चपाती रेसिपी
साहित्य:
- १ जुडी चिरलेला पालक
- ३-४ हिरव्या मिरच्या
- १/२ जुडी कोथिंबीर
- ५-६ लसुन पाकळ्या
- १/२ चमचा जिरे
- १/२ चमचा हळद
- २ वाट्या कणिक
- १/२ वाटी बेसन पीठ
- १/२ वाटी तांदळाचं पीठ
- १/२ चमचा जिरे पावडर
- १/२ चमचा धने पावडर
- चवीपुरतं मीठ
- अवशक्तेनुसार तेल
पालक चपाती कणिक
कृती:- प्रथम चिरलेला पालक, चिरलेली कोथिंबीर, हिरव्या मिरच्या, जिरे आणि लसुन पाकळ्या मिक्सरमध्ये बारीक करून घ्या.
- एका पराती मध्ये कणिक, बेसन पीठ, तांदळाचं पीठ, हळद, जिरे पावडर, धने पावडर आणि मिक्सर मध्ये बारीक केलेलं मिश्रण एकजीव करून घ्या.
- हे तयार झालेलं पीठ, पातळ ओल्या फडक्या मध्ये १५-२० मिनिटे झाकून ठेवा.
- नंतर त्याचे चपातीसाठी गोळे बनवून घ्या.
- तवा गरम करत ठेवा, आणि गोळ्यांच्या चपात्या लाटून घ्या, ह्या चपात्या खरपूस भाजून घ्या.
- दही, किंवा पुदिना चटणी किंवा लोणच्या सोबत सर्व्ह करा.
पालक चपात्या