Showing posts with label Spinach Roti recipe. Show all posts
Showing posts with label Spinach Roti recipe. Show all posts

Saturday, 8 June 2013

Spinach Roti Recipe: Palak Chapati (पालक चपाती) Recipe in Marathi

पौष्टिक पालक चपाती रेसिपी


साहित्य:
  • १ जुडी चिरलेला पालक
  • ३-४ हिरव्या मिरच्या
  • १/२ जुडी कोथिंबीर
  • ५-६ लसुन पाकळ्या
  • १/२ चमचा जिरे
  • १/२ चमचा हळद
  • २ वाट्या कणिक
  • १/२ वाटी बेसन पीठ
  • १/२ वाटी तांदळाचं पीठ
  • १/२ चमचा जिरे पावडर
  • १/२ चमचा धने पावडर
  • चवीपुरतं मीठ
  • अवशक्तेनुसार तेल
Palak chapati kanik

पालक चपाती कणिक

कृती:
  • प्रथम चिरलेला पालक, चिरलेली कोथिंबीर, हिरव्या मिरच्या, जिरे आणि लसुन पाकळ्या मिक्सरमध्ये बारीक करून घ्या.
  • एका पराती मध्ये कणिक, बेसन पीठ, तांदळाचं पीठ, हळद, जिरे पावडर, धने पावडर आणि मिक्सर मध्ये बारीक केलेलं मिश्रण एकजीव करून घ्या.
  • हे तयार झालेलं पीठ, पातळ ओल्या फडक्या मध्ये १५-२० मिनिटे झाकून ठेवा.
  • नंतर त्याचे चपातीसाठी गोळे बनवून घ्या.
  • तवा गरम करत ठेवा, आणि गोळ्यांच्या चपात्या लाटून घ्या, ह्या चपात्या खरपूस भाजून घ्या.
  • दही, किंवा पुदिना चटणी किंवा लोणच्या सोबत सर्व्ह करा.
Palak chapati

पालक चपात्या

Popular Recipes