कांदे पोहे रेसिपी
साहित्य:
- दीड वाटी पोहे
- दोन बारीक चिरलेले कांदे
- २ ते ३ बारीक चिरलेले हिरव्या मिरच्या
- अर्धी वाटी शेंगदाणे
- अर्धा चमचा जिरे
- अर्धा चमचा मोहरी
- अर्धा चमचा साखर
- अर्धा चमचा हळद
- अर्ध्या लिंबाचा रस
- ४ ते ५ कडीपता पाने
- दोन चमचे बारीक चिरलेली कोथिंबीर
- चवीनुसार मीठ
- आवश्यकतेनुसार तेल
- प्रथम पोहे निवडून घ्या.
- चाळणीत टाकून धुवून घ्या, आणि त्यामध्ये साखर व मीठ टाकून मिक्स करा .
- एका कढई मध्ये तेल गरम करा, त्यामध्ये शेंगदाणे तळून घ्या आणि पोह्यावर टाका.
- नंतर गरम तेलामध्ये कडीपता, जिरे, मोहरी, चिरलेला कांदा, हळद टाकून परतवून घ्या.
- आता त्यामध्ये शेंगदाणेसह मिक्स केलेले पोहे टाकून ३ ते ४ मिनिटे परतवून घ्या.
- नंतर त्यावर चिरलेली कोथिंबीर व लिंबाचा रस टाकून सर्व्ह करा .