पालक पनीर रेसिपी
साहित्य:
- एक जुडी पालक
- २०० गरम पनीर तुकडे
- एक टोमटो
- एक कांदा
- एक चमचा आले पेस्ट
- एक चमचा लसुण पेस्ट
- ४०० गरम दही
- एक वाटी बेसन
- १ ते १/२ चमचा लाल तिखट
- चवीनुसार मीठ
- आवश्यकतेनुसार तेल
- प्रथम पालक धुवून चिरून घ्या.
- बेसन भाजून घ्या.
- कांदा व टोमटो बारीक चिरून घ्या.
- पनीरचे लहान लहान तुकडे करून तळून घ्या.
- कुकरमध्ये मीठ व चिरलेला पालक टाकून एक शिटी करून घ्या.
- नंतर कुकरमधला पालक चाळणीत ऒतुन पाणी वेगळे करून घ्या.
- चाळणीतला पालक मिक्सरमधून बारीक वाटून घ्या.
- एका कढईमध्ये तेल गरम करून कांदा लाल होईपर्यंत भाजून घ्या.
- नंतर त्यामध्ये आले लसुण पेस्ट, बारीक चिरलेला टोमटो.लाल तिखट टाकून २ ते ३ मिनिट परतवून घ्या.
- आता त्यामध्ये दही व बेसन ऒतुन एकजीव करून घ्या.
- वाटलेला पालक व तळलेला पनीर टाकून हलवून घ्या.
- तसेच गाळून काढलेले पाणी ऒतुन ५ मिनिट उकळवून घ्या.
- पालक पनीर तयार आहे.
- चपाती किवा रोटी सोबत सर्व्ह करा.