कोकम सरबत रेसिपी
साहित्य:
- १ कप कोकम
- २ कप पाणी
- २ कप साखर
- ५-६ वेलची पूड
- १ भाजलेली चमचा जिरेपूड
- १-२ चिमुट काळे मिठ किंवा मिठ
- पाण्यात कोरडे कोकम स्वच्छ धुवा
- २ कप पाण्यामध्ये कोकम ३-४ तास भिजत ठेवा
- फक्त भिजलेला कोकम ब्लेन्ड करून घ्या, उरलेला पाणी तसच ठेवा
- थोडं भिजवत ठेवलेलं पाणी ब्लेंडर मध्ये घाला आणि पुन्हा कोकम ब्लेंड करून घ्या
- उरलेल्या पाण्यात २ कप साखर घाला, साखर घातलेलं मिश्रण व्यवस्थित उकळवून घ्या
- पाकासारखे घट्ट होऊ द्या हे मिश्रण, नंतर ते थंड होऊ द्या आणि त्यामध्ये ब्लेंड केलेला कोकम घाला
- त्यामध्ये वेलची पूड, जिरेपूड आणि मीठ घालून हे कोकम सिरप एका बाटलीमध्ये भरून फ्रीजमध्ये ठेवा
- सर्व्ह करताना, एका ग्लास मध्ये २-३ चमचे कोकम सिरप घ्या त्यामध्ये १ ग्लास पाणी आणि बर्फाचे तुकडे घाला, झकास कोकम सरबत तयार