डाळ पालक रेसिपी
साहित्य:
- तीन वाटी चिरलेला पालक
- एक वाटी मुगडाळ
- एक बारीक चिरलेला कांदा
- अर्धा चमचा जिरे
- अर्धा चमचा मोहरी
- अर्धा चमचा हळद
- अर्धा चमचा चाटमसाला
- चिमुटभर मिरेपूड
- चिमुटभर हिंग
- अर्धा चमचा लिंबाचा रस
- चवीनुसार मीठ
- आवश्यकतेनुसार तेल
कृती:
- प्रथम पालक धुवून चिरून घ्या.
- मुगडाळ धुवून भिजत ठेवा.
- कढई मध्ये तेल गरम करा त्यामध्ये जिरे, मोहरी, हिंग, हळद आणि बारीक चिरलेला कांदा चांगला परतवून घ्या.
- नंतर त्यामध्ये चिरलेला पालक व भिजवलेली मुगडाळ टाकून परतवून घ्या.
- चवीनुसार मीठ, मिरेपूड, व आवश्यकतेनुसार पाणी घालून ५ मिनिटे शिजवून घ्या.
- शिजत आल्यावर चाट मसाला व लिंबूचा रस घालुन गरम गरम सर्व्ह करा.