Showing posts with label chicken korma marathi. Show all posts
Showing posts with label chicken korma marathi. Show all posts

Friday, 10 May 2013

Chicken Korma Recipe in Marathi: चीकेन कोरमा रेसिपी

झणझणीत चिकन कोरमा रेसिपी


साहित्य:
  • १ किलो चिकन
  • तेल
  • ५-६ चमचे तूप
  • ३ चमचे जिरे
  • ७-८ वेलची
  • ५-६ लवंग
  • ३ चमचे लसुन पेस्ट
  • २ चमचा धने पावडर
  • २ चमचा लाल तिखट
  • मीठ चवीनुसार
  • दीड कप दही फेटलेले
  • २ चमचे आले पेस्ट
  • दीड कप कांदे चिरलेले
  • दीड चमचा मटण मसाला
  • २ चमचे केसरी रंग
कृती:
  • पॅन मध्ये तेल गरम करून घ्या, त्यामध्ये वेलची, लवंगा, लसूण घाला आणि नीट परतून घ्या
  • नंतर त्यामध्ये चिकन घाला आणि ४-५ मिनिटांसाठी परतत राहा
  • त्यामध्ये धणे पावडर, आले पेस्ट, लाल तिखट, तळलेला कांदा आणि चवीनुसार मीठ घालून २-३ मिनिटे परतून घ्या
  • नंतर त्यामध्ये फेटलेलं दही घालून २ मिनिटे परतून घ्या, चिकन मसाला आणि केशरी रंग घाला
  • रस्सा अति घट्ट असल्यास थोडा गरम पाणी घालून मंद आचेवर १०-१५ मिनिटे शिजू द्या
  • गरम गरम कोरमा कोथिंबीर घालून सजवा आणि भाकरी किंवा गरम भाताबरोबर सर्व्ह करा

Popular Recipes