काजू करी रेसिपी
साहित्य:
- ५० ग्रॅम खरबूज किंवा कालीगड बी
- १०० ग्रॅम खसखस
- ६० ग्रॅम खोबरे
- ५०० ग्रॅम कांदा
- अर्धा किलो टोमॅटो
- ५० ग्रॅम काजू
- ५० ग्रॅम चारोळी
- १०० ग्रॅम मावा
- अर्धा चमचा आले पेस्ट
- अर्धा चमचा जिरे
- अर्धा चमचा हळद
- १ ते २ हिरव्या मिरच्या
- २ चमचे बारीक चिरलेली कोथिंबीर
- चवीनुसार मीठ
- आवश्यकतेनुसार तेल
- प्रथम खसखस, खरबूज किंवा कलीगड बी, खोबरे, काजू, चारोळी वाटून घ्या.
- आणि काजू वेगले वाटून घावे.
- टोमॅटो प्युरी बनवून घ्या.
- कांदा टाळून वाटून घ्या.
- कढईत तेल गरम करून त्यात जिरे, हळद, हिरवी मिरची, आल पेस्ट आणि वाटलेले काजू टाकून तेलामध्ये चांगले परतवून घ्या.
- नंतर टोमॅटो प्युरी व बारीक केलेला कांदा टाकून ४ ते ५ मिनिटे परतवून घ्या.
- त्यामध्ये १०० ग्रॅम मावा, गरम मसाला, चवीनुसार मीठ व थोडेसे पाणी घालून मंद आचेवर ५ मिनिटे शिजवून घ्या.
- आणि काजू व कोथिंबीरने सजवून गरम गरम सर्व्ह करा.