ब्रेडचा हलवा रेसिपी
साहित्य:
- ८-१० ब्रेड स्लाईस
- २-३ मोठे चमचे साजूक तूप
- १/४ कप साखर
- ७-८ बदाम
- ७-८ काजू
- २-४ हिरव्या वेलची
- स्लाईसचे लहान-लहान तुकडे कापून घ्या.
- कढईत तूप गरम करून त्यात ब्रेडचे तुकडे परतून घ्या
- कुरकुरीत झालेल्या ब्रेडचे लहान-लहान तुकडे करून घ्या
- नंतर त्यामध्ये साखर, वेलचीपूड, दीड कप पाणी टाकून ढवळत हलवा भाजून घ्या
- काजू-बदाम घालून रेसिपी सजवून सर्व्ह करा