मिक्स्ड पालेभाजीचे वडे
साहित्य:
- १ कप मूल्याची पाने
- १ कप पालक
- १/२ कप मेथीची पाने
- १/२ कप फ्लॉवरची पाने
- १/२ कप कोथिंबीर
- १ कप कोबी
- १ कप रागीचे पीठ
- १/२ कप कणिक
- १/२ कप बेसन
- २-३ हिरव्या मिरच्या
- १/२ चमचा लिंबाचा रस
- तळण्यासाठी तेल
- चवीनुसार मीठ
- सर्व पालेभाज्या चिरून धुवून घ्या
- रागीचा पीठ, कणिक आणि बेसन एकत्र करून चाळून घ्या
- एका बाउलमध्ये सर्व भाज्या, चाळलेले पीठ, मीठ लिंबाचा रस, मिरची पाणी घालून एकत्र करून घ्या
- एकत्रित केलेल्या कणकेचे गोल चपटे वडे बनवून, मंद आचेवर तळून घ्या
- गरम-गरम वडे खोबऱ्याच्या चटणीबरोबर सर्व्ह करा