Sunday 30 August 2015

Krishna Janmashtami Gokul Ashtami Recipes: कृष्ण जन्माष्टमी

कृष्ण जन्माष्टमी या सणाला कृष्णाष्टमी असे हे संबोधले जाते, यास गोकुळाष्टमी किंवा श्री कृष्ण जयंती असे हि म्हटले जाते. हा सण हिंदू धर्माचे भगवंत श्री कृष्ण यांचा जन्म दिवस म्हणून साजरा केला जातो. हा सण भाद्रपद महिन्यातल्या कृष्ण पक्ष्यातील आठव्या दिवशी साजरा केला जातो.

हिंदू धर्मीय जन्माष्टमी उपवास धरून साजरी करतात, या दिवशी रात्री १२ वाजता ते उपवास सोडतात, रात्री १२ वाजता श्री कृष्णाचा जन्म उत्सव साजरा केला जातो. एक पाळणा बांधला जातो त्या पाळण्यामध्ये श्री कृष्णाची मूर्ती ठेवून तिचे पूजन केले जाते. त्या दिवशी सर्व भक्तजण त्या पाळण्या भोवती गाणी भक्ती गीत म्हणत नाचतात आणि देवाच्या भक्ती मध्ये तल्लीन होतात. काही देवळांमध्ये भगवद गीता वाचनाचे आयोजन केले जाते.

संपूर्ण भारता मध्ये हा सण वेग-वेगळ्या पद्धतीने साजरा केला जातो, मुख्यता उत्तर भारत, महराष्ट्र, गुजरात आणि दक्षिण भारत इथे हा सण मोठया प्रमाणात साजरा केला जातो.

या सणा दिवशी घरोघरी गोड पकवान खूप बनवले जातात, काही पकवान हे खूप प्रसिद्ध आहेत त्यापैकी काही रेसिपीस आम्ही तुमच्यासाठी आणल्या आहेत, त्या तुम्हाला नक्कीच आवडतील. काही रेसिपीस गोड आहेत, काही तिखट तर काही चमचमीत रेसिपीस आहेत, आनंद घ्या या special जन्माष्टमी रेसिपिसचा.

Shrikhand Recipe in Marathi Shabudana Thalipeeth Recipe in Marathi Sabudana Vada Recipe in Marathi Coconut Barfi (Narlachi Barfi)

Shrikhand Recipe in Marathi: श्रीखंड रेसिपी

श्रीखंड रेसिपी

साहित्य:
  • २५० ग्राम चक्का
  • १ कप साखर
  • १ लहान चमचा वेलचीपूड
  • १ लहान चमचा चारोळी
  • १ मोठा चमचा पिस्त्याचे काप
  • १ मोठा चमचा बदामाचे पातळ काप


कृती:
  • एका बोलमध्ये चक्क घ्या, त्यात साखर घालून निट मिक्स करा.
  • चक्का आणि साखरेचे मिश्रण पुरणयंत्रातून (बारीक जाळी वापरून) फिरवावे, असे केल्याने चक्का आणि साखर व्याव्स्तीथ मिक्स होतात.
  • गाळलेल्या तयार मिश्रणात वेलचीपूड, चारोळ्या, पिस्ता, आणि बदाम घालून व्यवस्थित मिक्स करावे.
  • तयार श्रिखंड सर्व्हींग बोलमध्ये काढून फ्रिजमध्ये ठेवावे.
  • थंडगार श्रीखंड पुरीबरोबर सर्व्ह करावे.

Sabudana Sago Thalipeeth Recipe in Marathi: साबुदाणा थालीपीठ रेसिपी

साबुदाणा थालीपीठ रेसिपी

साहित्य:
  • २/३ कप साबुदाणा
  • २ मध्यम आकाराचे उकडलेले बटाटे
  • १/२ लहान चमचा जीरा पावडर
  • ४ मोठे चमचे शेंगदाणा कूट
  • 2-3 हिरव्या मिरच्या
  • १/४ कप चिरलेली कोथिंबीर
  • १ चमचा लिंबाचा रस
  • १ छोटा चमचा साखर
  • सैंधव मीठ चवीनुसार
  • तेल आवश्यकतेनुसार
Sabudana Sago Thalipeeth Recipe in Marathi

कृती:
  • साबुदाणा स्वच्छ धुवून घ्या आणि ते रात्रभर भिजत ठेवा.
  • बटाटे मॅश करून घ्या.
  • भिजवलेला साबुदाणा, मॅश केलेले बटाटे, मिरच्यांचे वाटण, जीरेपूड, शेंगदाण्याचा कूट, कोथिंबीर, लिंबाचा रस आणि चवीपुरते मीठ घालून नीट मिक्स करावे.
  • मिश्रणाचे गोळे करून घ्या, त्या गोळ्यांचे थालीपीठ थापून घ्या.
  • एका पॅनमध्ये १-२ मोठा चमचा तेल गरम करा.
  • हे थालीपीठ खरपूस भाजून घ्या.
  • शेंगदाण्याच्या गोड चटणी किंवा दहीबरोबर सर्व्ह करा.

Thursday 27 August 2015

Onion Kanda Soup Recipe in Marathi: कांद्याचे सूप

कांद्याचे सूप

साहित्य:
  • दोन मोठे चिरलेले कांदे
  • दोन चमचे चिरलेले कोथिंबीर
  • एक मोठा चमचा चिंचेचा कोळ
  • एक लाल मिरची
  • एक ते दोन लसुन पाकळ्या
  • एक चमचा मैदा
  • एक वाटी वेगवेगळ्या भाज्या
  • चिमुटभर काळेमिरी पावडर
  • एक चमचा लोणी
  • चवीनुसार मीठ
कृती:
  • प्रथम एका पातेल्या मध्ये लोणी गरम करून घ्या.
  • त्या गरम लोण्यामध्ये चिरलेला कांदा व मैदा परतवून थंड करून घ्या. आता मिक्सर मध्ये चिंचेचा कोळ, लसुन पाकळ्य , लाल मिरची, परतवलेला कांदा व मैदा, एक वाटी मिक्स भाज्या वाटून घ्या. त्यामध्ये काळीमिरी पावडर व मीठ घाला. आणि हे मिश्रण पाच ते सात मिनिटे उकळत ठेवा. सेर्व्हिंग बाऊल मध्ये काढून कोथिंबीरने सजवून घ्या. गरम गरम सर्व्ह करा.

Coconut Soup Recipe in Marathi Naralache Soup Recipe

कोकोनट सूप

साहित्य:
  • एक किसलेला नारळ
  • एक ते दोन हिरव्या मिरच्या
  • एक मोठा चिरलेले कांदे
  • दोन चमचे चिरलेले कोथिंबीर
  • एक मोठा चमचा चिंचेचा कोळ
  • तीन ते चार कडीपत्याची पाने
  • अर्धा चमचा जिरे पावडर
  • चिमुटभर काळेमिरी पावडर
  • एक चमचा तेल
  • चवीनुसार मीठ
कृती:
  • प्रथम किसलेला नारळाच दुध काढून घ्या.
  • त्या रसामध्ये चिंचेचा कोळ मिक्स करून घ्या.
  • आणि ते मिश्रण पाच ते सात मिनिटे उकळत ठेवा.
  • आता एका पातेल्या मध्ये तेल गरम करून त्यामध्ये चिरलेला कांदा ,हिरवी मिरची , कढीपता काळेमिरी पावडर,जिरे पावडर व मीठ टाकून परतवून घ्या.
  • त्यामध्ये दुध व चिंचेच्या कोळाचे मिश्रण ओतून ४ ते ५ मिनिटे हालवथ राहा.
  • सर्विंग बाऊल मध्ये काढून कोथिंबीरने सजवून घ्या.
  • गरम गरम सर्व्ह करा.

Sunday 27 October 2013

Til Khava (Mawa) Ladoo Recipe: Til Khoya Laddu Recipe in Marathi

तील खव्याचे लाडू रेसिपी


साहित्य:
  • १०० ग्रॅम भाजलेले तीळ
  • १०० ग्रॅम खवा कुस्करलेला
  • १०० ग्रॅम साखर
  • अर्धा कप चिप्स
कृती:
  • भाजलेले तील मिक्सरमध्ये बारीक करून घ्या.
  • साखरेत थोडसं पाणी घालून पाक तयार करून घ्या.
  • त्यामध्ये तील आणि खवा मिसळा.
  • हे मिश्रण थंड होऊ द्या. थंड झाल्यावर त्याचे लाडू वळून घ्या, वरून चॉकलेट चिप्स लावा, लाडू तयार आहेत.

Saturday 26 October 2013

Chakli Recipe in Marathi: Chakli for Diwali

चकली रेसिपी खास दिवाळी साठी


साहित्य:
  • ४ वाट्या तांदूळ
  • दीड वाटी हरभरा डाळ
  • पाव वाटी मूग डाळ
  • पाव वाटी उडीद डाळ
  • १ चमचा धने
  • १/२ चमचा जिरे
  • १/२ चमचा बडीशेप
  • चकली मसाला एक
  • १/२ चमचा लाल मिरची पावडर
  • आवश्यकतेनुसार मीठ
  • आवश्यकतेनुसार तेल
  • ४ छोटे चमचे मोहनासाठी तेल
Chakli Recipe
कृती:
  • तांदूळ धुवून सावलीमध्ये सुकवून घ्या.
  • कढई गरम करून त्यामध्ये सुकवलेले तांदूळ खरपूस भाजून घ्या.
  • त्याचप्रमाणे तिन्ही डाळी भाजून घ्या.
  • धने, जिरे, बडीशेप भाजून घ्या.
  • सर्व भाजलेली सामग्री एकजीव करा आणि दळून आणा.
  • दळून आणलेले मिश्रण चाळून घ्या.
  • एका पातेल्यामध्ये एक ते दीड ग्लास पाणी गरम करत ठेवा.
  • त्यामध्ये चवीनुसार मीठ, चकली मसाला, लाल मिरची पावडर, ४ चमचे तेल टाकून एक उकळी आणा.
  • त्या पाण्यामध्ये चाळलेलं पीठ टाका, आता एक वाफ आणा.
  • पीठ एकजीव करा, झाकून ठेवून मंद आचेवर ५ मिनिटे शिजू द्या.
  • हे पीठ एका थाळीमध्ये घ्या आणि ते घोटून घ्या, काळजी घ्या कि गीठ्ल्या राहू नयेत. आता कोमट पाणी घालून हे पीठ मळून घ्या.
  • आता पिठाच्या चकल्या पाडून घ्या.
  • गरम तेलामध्ये खरपूस, कुर-कुरित होईपर्यंत तळुन घ्या. कुरकुरीत चकल्या तयार आहेत, ह्या चकल्या बंद डब्यात १५ दिवस छान टिकतात.

Besan Ladoo Recipe in Marathi: Diwali Besan Laddu Recipe

बेसनचे लाडू रेसिपी


साहित्य:
  • १ किलो हरभरा डाळ
  • ३०० ग्राम पिठी साखर
  • ५०० ग्राम तूप
  • १ मोठा चमचा वेलची पूड
  • १/२ वाटी बेदाणे
  • १/२ वाटी काजू तुकडे
  • १/२ चमच जायफळ पूड
  • एक वाटी दुध (आवश्यकता असल्यास)
Besan Ladoo Recipe in Marathi

कृती:
  • कढईमध्ये डाळ मंद आचेवर भाजून घ्या, थंड झाल्यावर ती दळून आणा.
  • दळून आणलेले पीठ चाळून घ्या.
  • एका कढईमध्ये थोडे तूप गरम करा, थोडे-थोडे पीठ घालून भाजून घ्या. पिठाच्या गीठ्ल्या होणार नाहीत याची काळजी घ्या.
  • सर्व पीठ भाजून झाल्यावर ते एका पातेल्या मध्ये काढून घ्या.
  • थोडा वेळ हे पीठ थंड होऊ द्या.
  • त्यामध्ये पिठी साखर, वेलची पूड, जायफळ पूड घालून एकजीव करा.
  • आता हाताने गोल लाडू वळून घ्या. लाडू वळता येत नसतील तर त्यामध्ये दुध घाला.
  • प्रत्यक लाडूला बेदाणा आणि एक काजूचा तुकडा लावा.

Sunday 28 July 2013

Kairi Dudhi Pakoda Recipe: Kairi Dudhi Bhaji

कैरि दुधि पकोडा रेसिपी


साहित्य:
  • एक वाटी किसलेला दुधी
  • एक वाटी कैरचा क़ीस
  • १ चिमुट ओवा
  • अर्धा चमचा लाल तिखट
  • अर्धा चमचा चाट मसाला
  • दीड वाटी बेसन
  • बारीक़ तीन-चार हिरव्या मिरच्या
  • पाच-सहा पुदिन्याची पाने
  • चवीप्रमाणे मीठ
  • तऴण्यासाटी तेल.
  • आवश्यकतेनुसार पाणी
कृती:
  • बेसन चाळून घ्या.त्यामध्ये दुधीचा कीस, केरीचा कीस, ओवा, चिरलेली हिरवी मिरची, चिरलेले पुदिन्याची पाने, चाट मसाला, मीठ व पाणी घालून पीठ चांगले एकजीव करून घ्या.
  • एका कढईमध्ये तेल गरम करून घ्या.
  • त्यामध्ये तयार पीठाचे भजीच्या आकाराचे गोळे बनवून मंद आचेवर तळून घ्या
  • सर्विंग डिशमध्ये काढून घ्या.
  • गरमा गरम भजी हिरव्या चटणीसोबत सर्व्ह करा.

Palak Paneer Recipe: Tasty Spinach Paneer Recipe

पालक पनीर रेसिपी


साहित्य:
  • एक जुडी पालक
  • २०० गरम पनीर तुकडे
  • एक टोमटो
  • एक कांदा
  • एक चमचा आले पेस्ट
  • एक चमचा लसुण पेस्ट
  • ४०० गरम दही
  • एक वाटी बेसन
  • १ ते १/२ चमचा लाल तिखट
  • चवीनुसार मीठ
  • आवश्यकतेनुसार तेल
कृती:
  • प्रथम पालक धुवून चिरून घ्या.
  • बेसन भाजून घ्या.
  • कांदा व टोमटो बारीक चिरून घ्या.
  • पनीरचे लहान लहान तुकडे करून तळून घ्या.
  • कुकरमध्ये मीठ व चिरलेला पालक टाकून एक शिटी करून घ्या.
  • नंतर कुकरमधला पालक चाळणीत ऒतुन पाणी वेगळे करून घ्या.
  • चाळणीतला पालक मिक्सरमधून बारीक वाटून घ्या.
  • एका कढईमध्ये तेल गरम करून कांदा लाल होईपर्यंत भाजून घ्या.
  • नंतर त्यामध्ये आले लसुण पेस्ट, बारीक चिरलेला टोमटो.लाल तिखट टाकून २ ते ३ मिनिट परतवून घ्या.
  • आता त्यामध्ये दही व बेसन ऒतुन एकजीव करून घ्या.
  • वाटलेला पालक व तळलेला पनीर टाकून हलवून घ्या.
  • तसेच गाळून काढलेले पाणी ऒतुन ५ मिनिट उकळवून घ्या.
  • पालक पनीर तयार आहे.
  • चपाती किवा रोटी सोबत सर्व्ह करा.

Sprouted Healthy Indian Chaat Recipe

पौष्टिक चाट रेसिपी


साहित्य:
  • एक वाटी मोड आलेली मटकी
  • एक वाटी मोड आलेली मसूर
  • दोन बारीक चिरलेले कांदे
  • एक चिरलेली काकडी
  • दोन लहान उकडलेले बटाटे
  • अर्धी वाटी भाजलेले शेंगदाणे
  • अर्धी वाटी नारळाचा खीस
  • एक लिंबू
  • दोन चमचे चिरलेली कोथिंबीर
  • एक चमचा चाट मसाला
  • अर्धा चमचा जिरे
  • अर्धा चमचा मोहरी
  • अर्धा चमचा हळद
  • चिमुठभर हिंग
  • ५ ते ६ हिरव्या मिरच्या
  • चवीनुसार मीठ
  • आवश्यकतेनुसार तेल
कृती:
  • प्रथम मोड आलेले मटकी व मसूर एकत्र मिक्सरमधून वाटून घ्या.
  • एका बाउलमध्ये भरडलेली मटकी व मसूर काढून घ्या.
  • आता यामध्ये चिरलेला कांदा, उकडलेला बटाटा, भाजके शेंगदाणे, नारळाचा खीस, मीठ, कोथिंबीर घालून मिक्स करून घ्या.
  • आता कढई मध्ये तेल गरम करून जिरे, मोहरी, हिंग. हळद आणि हिरव्या मिरच्या घालून फोडणी तयार करून घ्या.
  • ही फोडणी तयार मिश्रणावर ओतून घ्या.
  • नंतर लिंबू पिळा व चाट मसाला टाकून सर्विंग बाउल मध्ये काढून घ्या.
  • गरमा गरम सर्व्ह करा.

Thursday 25 July 2013

Kande Pohe Recipe: Kanda Poha Recipe in Marathi कांदे पोहे

कांदे पोहे रेसिपी


साहित्य:
  • दीड वाटी पोहे
  • दोन बारीक चिरलेले कांदे
  • २ ते ३ बारीक चिरलेले हिरव्या मिरच्या
  • अर्धी वाटी शेंगदाणे
  • अर्धा चमचा जिरे
  • अर्धा चमचा मोहरी
  • अर्धा चमचा साखर
  • अर्धा चमचा हळद
  • अर्ध्या लिंबाचा रस
  • ४ ते ५ कडीपता पाने
  • दोन चमचे बारीक चिरलेली कोथिंबीर
  • चवीनुसार मीठ
  • आवश्यकतेनुसार तेल
कृती:
  • प्रथम पोहे निवडून घ्या.
  • चाळणीत टाकून धुवून घ्या, आणि त्यामध्ये साखर व मीठ टाकून मिक्स करा .
  • एका कढई मध्ये तेल गरम करा, त्यामध्ये शेंगदाणे तळून घ्या आणि पोह्यावर टाका.
  • नंतर गरम तेलामध्ये कडीपता, जिरे, मोहरी, चिरलेला कांदा, हळद टाकून परतवून घ्या.
  • आता त्यामध्ये शेंगदाणेसह मिक्स केलेले पोहे टाकून ३ ते ४ मिनिटे परतवून घ्या.
  • नंतर त्यावर चिरलेली कोथिंबीर व लिंबाचा रस टाकून सर्व्ह करा .

Popular Recipes