Saturday 23 March 2013

Egg Paratha Recipe: How To Cook Baida (Anda) Roti Marathi

अंडा पराठा रेसिपि


साहित्य:
  • मैदा १ वाटी
  • साखर चिमुट भर
  • मीठ चवीनुसार
  • ४ अंडी
  • चिरलेली कोथिम्बिर एक चमचा
  • कांदे २
  • मिरे पावडर चिमुटभर
  • धने पावडर १/२ चमचा
  • दुध अर्धा वाटी
  • कडी पत्ता ८-१० पाने
  • बडीशेप पावडर १/२ चमचा
  • आले-लसुन पेस्ट १ Tsp
  • हळद १/२ चमचा
  • तेल अवशक्तेनुसार

अंडा पराठा रेसिपि कृती

  • एक वाटी मैदा घ्या त्यामध्ये चवीनुसार मीठ, साखर आणि  अंड्याचा दोन चमचे पांढरा भाग mix करून दुध घालून मळून घ्या.
  • ती कणिक अर्धा तास भिजत ठेवा. एका bowl मध्ये अंडी फेटून घ्या, आणि bowl बाजूला ठेवून द्या.
  • एका pan मध्ये तेल गरम करून घ्या, त्या मध्ये कढी पत्ता घाला, नंतर त्या मध्ये लसुन, आले पेस्ट, बारीक चिरलेला कांदा घालून ते मिश्रण परतून घ्या.
  • या मिश्रणात हळद, मिरे पावडर, धने पावडर, बडीशेप पावडर घालून एक जीव करा. पुन्हा या मिश्रणात लाल तिखट, चवीपुरते मीठ घालून थंड करत ठेवा. 
  • थंड झालेलं मिश्रण फेटलेल्या अंड्यामध्ये ओता, हे सर्व मिश्रण एक जीव करून घ्या.
  • भिजलेला कणकेचे २ गोळे करा आणि त्या गोळ्यांचे २ पराठे लाटून घ्या. गरम झालेल्या तव्यावर थोडसं तेल टाका, आणि त्यावर लाटलेला पराठा टाका.
  • या पराठ्यावर ३-४ चमचे अंड्यात एक जीव केलेले वरील मिश्रण ओता. नंतर पराठा २ बाजूनी फोल्ड करून, पुन्हा त्यावर १ चमचा वरील मिश्रण लावून घ्या.
  • पुन्हा उरलेल्या दोन्ही बाजू फोल्ड करून घ्या. नंतर दोन्ही बाजूनी तेल लावून पराठा शेकून घ्या.
  • शेकलेला पराठा कर्णरेषेने एक समान कापून घ्या.
  • सर्व्हिंग डिश मध्ये कोथिंब्रीने पराठा सजवून घ्या, सॉस किंवा सेजवान चटणी बरोबर सर्व्ह करा.

Popular Recipes